एक्स्प्लोर

Tukaram Mundhe : गुटखा मिळेना म्हणून तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या परप्रांतीय ओला चालकाला अटक

Tukaram Mundhe Latest News : गुटखा बंदी झाल्यामुळे आरोपीने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार केला. 

ठाणे : राज्यात एकीकडे अनेक ठिकाणी छापेमारी करून भेसळ रोखण्याचं काम करणाऱ्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचं कौतुक सुरू असलं तरी काही भुरट्या आणि विकृत लोकांकडून त्यांच्याविरोधात राग व्यक्त केला जात असल्याचं चित्र आहे. कल्याणमध्येही असाच काहीसा प्रकार घडला. कोणत्याही टपरीवर गुटखा मिळत नाही म्हणून एका परप्रांतीय व्यक्तीने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात व्हिडीओ करत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. दुर्गाप्रसाद पांडे असं आरोपीचं नाव असून खडकपाडा पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे. 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात गुटखा बंद केला असून गुटखा विक्री करण्याऱ्याच्या विरोधात मोक्का लावण्याचं जाहीर केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या या इशाऱ्यामुळे बहुतांश ठिकाणी गुटखा बंद झाला आहे. कल्याणमध्येही हे चित्र आहे. 

Kalyan Ola Driver Tukaram Mundhe Video : गुटखा मिळत नाही म्हणून शिवीगाळ

गुटखा मिळत नाही या रागातून दुर्गाप्रसाद पांडे या ओला कॅब चालकाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये या पांडेने तुकाराम मुंढे यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचं दिसून आलं. मात्र ही शिवीगाळ या पांडेला चांगलीच महागात पडल्याचं दिसून आलं. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत या विकृताचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुटख्याची टंचाई निर्माण झाल्याने आणि एफडीएच्या कडक कारवाईमुळे गुटखा मिळत नसल्याने आरोपी दुर्गाप्रसाद पांडे प्रचंड नाराज होता. त्यातच त्याच्या वडिलांची टपरी देखील बंद झाली होती. या सर्व गोष्टींचा राग मनात धरून त्याने थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

Tukaram Mundhe Gutkha Action : कॅब चालकाला बेड्या

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमर वाघमोडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस अधिकारी भूषण देवरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या 4 तासांच्या आत आरोपीला अटक केले.

अटक करण्यात आलेला दुर्गाप्रसाद पांडे हा कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात राहणारा असून तो व्यवसायाने ओला कॅब चालक आहे. सध्या खडकपाडा पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL : 6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
6,6,6,6 गुरनूर ब्रारने दणादण षटकार ठोकले, बसलेले सगळे उठले; गंभीर जे केले, ते सर्व बघत बसले, शेवटच्या षटकातील थरार, VIDEO
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
Embed widget