मालाडच्या ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांच्या बेड्या, गुजरातमधून केली अटक
मालाडच्या एका ज्वेलरी व्यापाऱ्यावर नजर ठेवून त्याच्याकडील 21 लाखांची रोकड पळवणाऱ्या दोन आरोपींना दिंडोशी पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे.
![मालाडच्या ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांच्या बेड्या, गुजरातमधून केली अटक Thieves robbing Malad jewelery trader arrested in Gujrat by Dindoshi Police मालाडच्या ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांच्या बेड्या, गुजरातमधून केली अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/28/13673005529fabfae423cc2d582d17fd_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मालाड पूर्वेत ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांनी अटक केले आहे. या दोन चोरांकडून पोलिसांनी तब्बल 13 लाख रुपयांची रोकड आणि एक स्पोर्ट्स बाइक हस्तगत केली आहे.
मलाड पूर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ एक ज्वेलरी व्यापारी अॅक्टिव्हा बाईक घेऊन उभा होता. मात्र त्याच वेळी हे दोघे चोर एका स्पोर्ट बाईक वर बसून आले आणि त्या ज्वेलरी व्यापाराच्या अॅक्टिव्हाची चावी काढून घेतली. नंतर त्या गाडीच्या डिक्कीमधून 21 लाख रुपये घेऊन फरार झालेत.
या चोरीची संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे. स्पोर्ट बाईकवर हे दोघे गुजरातमधून मुंबईत येऊन मालाडमध्ये व्यापाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्या हातातील रोकड लुटायचे. दिंडोशी पोलिसांनी अटक केलेले हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून गुजरातमधील छारानगर व कुबेरनगर या भागातले रहिवासी आहेत.
दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ह्या दोन्ही आरोपी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली. विशाल विक्रम तमंचे (42) व अमित नरेश तमंचे (25) वर्षीय अशी त्यांची नावं आहेत. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 23 लाखाची रक्कम पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकारचे आणखी गुन्हे आरोपींनी नेमके कुठे केले आहेत याचा देखील तपास पोलीस घेत आहेत .
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)