एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईच्या गोवंडीत अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार; 18 वर्षांच्या तरुणाला चॉपरने सपासप वार करुन संपवलं

Mumbai Crime: मुंबई उपनगरातील गोवंडी परिसरात अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai Crime मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यापाठोपाठ मुंबईतही गुन्हेगारी घटनांचे (Mumbai Crime) प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यातील कोयता गँगचे किस्से आतापर्यंत कानावर येत होते. मात्र, मुंबई उपनगरातील गोवंडी परिसरात अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

गोवंडी परिसरात पूर्ववैमन्यसातून एका 18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या तरुणाचे नाव सईद पठाण असे होते. एका जुन्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी सईदवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचे चित्रण एका व्यक्तीने मोबाईलमध्ये केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण खाली निपचित पडलेल्या सईद पठाण याच्या डोक्यावर चॉपरने सपासप वार करताना दिसत आहे. 

याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांनी तलवार आणि चॉपरने वार करुन सईदची हत्या केली. व्हिडीओमध्ये सईद पठाण हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडलेला दिसत आहे. मात्र, तरीही त्याच्यावर हल्ला करणारा एक तरुण चॉपरने त्याच्या डोक्यात वार करताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर आजुबाजूला लोकांची गर्दी दिसत आहे. काहीजण सईदला वाचवण्यासाठी पुढे येऊ पाहत होते. मात्र, हल्लेखोरांपैकी एकाने हातातला चॉपर हवेत फिरवून त्यांना लांबच राहण्याचा इशारा दिला. सईद पठाण पूर्णपणे मेल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोर तिथून गेले. गोवंडीत भरदिवसा इतक्या निर्घृणपणे तरुणाची हत्या झाल्याने मुंबईत पोलिसांचा धाक उरलेला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरावतीत मसाज पार्लरवर धाड-

अमरावतीच्या राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावरील एका स्पा-मसाज सेंटरवर सिटी कोतवाली पोलिसांनी काल धाड टाकत स्पा भागीदारासह चार तरुण आणि तीन तरुणींना ताब्यात घेतले. या स्पा सेंटरवर मसाजच्या नावावर देहविक्रीचा व्यवसाय आणि तरुणीईचे अश्लील चाळे सुरू असल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली. एक वर्षापासून हा स्पा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अनेक संशयास्पद साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही अंडरगारमेंट्स बाथरुममध्ये आढळून आले. अमरावती शहराच्या मध्यवस्तीत अशाप्रकारे सुरू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराची चौकशी सिटी कोतवाली पोलीस करत आहे. 

संबंधित बातमी:

अमरावतीत मसाज पार्लरवर धाड, बाथरुममध्ये अंडरगारमेंट्स, तरुण मुली नको त्या अवस्थेत सापडल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget