एक्स्प्लोर

Solapur Crime Govind Barge: उजव्या कानशि‍लात झाडलेली गोळी डाव्या डोळ्याच्या भुवईच्यावरुन बाहेर पडली, बीडच्या उपसरपंचाचा अंत कसा झाला?

Solapur Crime Govind Barge: 2024 मध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती.

Solapur Crime Govind Barge: कलाकेंद्रातील नर्तकीच्या नादात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करणारे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे सरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे यांनी त्यांच्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. बर्गे यांनी उजव्या कानशि‍लावर पिस्तुल ठेवून चाप ओढला होता. पिस्तुलातून सुटलेली गोळी थेट त्यांच्या डोक्यात शिरली होती आणि डाव्या डोळ्याच्या भुवईचा वरचा भाग आणि कानाच्यामधून बाहेर पडली होती. गोळी लागल्यानंतर गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीटवर एका बाजूला पडले आणि आठ ते दहा मिनिटांत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

गोविंद बर्गे यांचे गेल्या दीड वर्षांपासून पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी प्रेमसंबंध होते. पूजा गायकवाड ही अवघ्या 21 वर्षांची होती. गोविंद बर्गे हे 8 सप्टेंबरला रात्री बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील पूजाच्या घरी गेले होते. त्यानंतर 9 सप्टेंबरला पूजाच्या घरापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या गाडीत बर्गे यांचा मृतदेह सापडला होता. पोलीस गोविंद बर्गे यांच्या गाडीपाशी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपले होते. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करताना गाडी सुरु ठेवली होती. गाडीतील एसीही सुरु होता. मात्र, बराचवेळ गाडीचं इग्निशन सुरु राहिल्याने बॅटरी आणि डिझेल पूर्णपणे संपले होते. याशिवाय, पोलिसांना गोविंद बर्गे यांच्या गाडीत बिअरचे कॅन मिळाले.

पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांच्याकडून दागिने, पैसे आणि प्लॉट घेतला होता. मात्र, अलीकडेच तिची नजर गोविंद बर्गे यांच्या गेवराईतील अलिशान बंगल्यावर पडली होती. तिने हा बंगला आपल्या नावावर करुन देण्यासाठी गोविंद बर्गे यांच्याकडे हट्ट धरला होता. ही मागणी पूर्ण न केल्यास तुमच्याशी बोलणार नाही आणि तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती. त्यामुळे गोविंद बर्गे हे तणावात होते.

Dancer Pooja Gaikwad: मी पूजाला सख्ख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला पण... गोविंद बर्गेंची खंत

गोविंद बर्गे याने पूजा गायकवाड हिला गेवराईतील नवीन बंगला बघण्यासाठी बोलावले होते. हा बंगला पूजाला खूप आवडला होता. तिने दोन दिवस तिकडेच मुक्काम केला होता. यानंतर पूजाने हा बंगला माझ्या नावावर करा, अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य न झाल्यामुळे पूजाने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी गोविंद बर्गे यांना दिली होती. गोविंद बर्गे यांनी आपल्या एका मित्राशी बोलताना म्हटले होते की, मी पूजाला सख्ख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला. पैसे दिले, जमीन दिली. पण ही आता मला सतत धमकी देत आहे. या सगळ्याचा मला मानसिक त्रास होत आहे, असे गोविंद बर्गे म्हणाले होते.

2024 मध्ये धाराशिवमधील तुळजाभवानी केंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा गायकवाड हिच्याशी ओळख झाली. ती मूळची सोलापूरच्या बार्शी येथील होती. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर पूजाने गोविंद यांना म्हटले की, आजपासून मी तुमची मालकीण म्हणून सगळं काम करते. त्यामुळे आता तुम्ही माझा सगळा घरखर्च पाहायचा. त्यानुसार गोविंद बर्गे हे पूजाला आणि तिच्या नातेवाईकांना पैसे देत होते.

आणखी वाचा

नर्तिका पूजावर पाण्यासारखा पैसा उधळला, मरताना उपसरपंचाच्या खिशात फक्त 900 रुपये उरले!

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget