एक्स्प्लोर

Shrish Valsangkar: ऑनड्यूटी रिक्षातून जायची, लिंबू-बाहुल्या घेऊन यायची; वळसंगकर रुग्णालयात मनीषा मुसळे-मानेची काळी जादू

Dr. Shrish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dr. Shrish Valsangkar Solapur: सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shrish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने काम करत होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मनीषा हिला अटक केली. सध्या मनीषा पोलीस कोठडीत आहे. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

रुग्णालयात मनीषा करायची काळी जादू-

लोकमतच्या वृत्तानूसार, शिरीष वळसंगकर  यांच्या एका विश्वासू व्यक्तीने सांगितले की, शिरीष वळसंगकरांना रुग्णालायत जे सुरु होते, त्याचा वैताग आला होता. त्यांनी स्वत: विविध विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली, त्यानंतर मनीषा खूप त्रस्त झाली. यामुळे मनीषाने काळ्या जागूचाही प्रयोग करण्यास सुरुवात केली. मावस्येच्या दिवशी मनीषा ऑनड्यूटीवर असताना अचानक रिक्षातून कुठेतरी जायची आणि येताना लिंबू आणि काळ्या बाहुल्या घेऊन यायची. त्यानंतर रुग्णालयातच लिंबू आणि काळ्या बाहुल्या ठेऊन मनीषा जायची, अशी माहिती डॉक्टरांच्या विश्वासू व्यक्तीने दिली. 

मनीषा मुसळे-मानेशिवाय रुग्णालयाची काडीसुद्धा हलत नव्हती-

शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती. कालांतराने डॉक्टर वळसंगकर यांच्या घरातली मनीषा सदस्य बनली. हॉस्पिटलमध्ये बघता बघता चांगल स्थान मिळवलं. डॉक्टर वळसंगकर यांच्यानंतर मनीषा हिचीच हॉस्पिटलमध्ये चलती होती. डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफसुद्धा तिला घाबरुन होते. तिचे इतके प्रस्थ होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हलत नव्हती, अशी परिस्थिती होती. सामान्य घरातून आलेली आणि जवळपास 20 ते 25 वर्षे हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुखपद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत असे समजते. मनीषा खूप वर्षापासून हॉस्पिटलचे कामकाज बघत आहे. शिवाय मनीषा आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये, म्हणून  कुटुंबातील सदस्यांमध्येसुद्धा वाद होता. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना तीने एक ई-मेल केला. त्यात तीने म्हटलेलं की ‘ मी इतक्या वर्षांपासून आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. पण आता अचानकपणे माझ्या पगार मध्ये कपात केली जात आहे. माझे अधिकार कमी जात आहेत. हे योग्य नाही जर हे असेच सुरू होणार असेल तर मी आत्मदहन करेन. तिच्या या ईमेल नंतर डॉक्टर वळसंगकर यांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. अशा आत्महत्येच्या धमकीच्या ईमेल मुळे डॉ. वळसंगकर यांना मानसिक त्रास झाला. त्यांनी तिला बोलावून समजावले देखील होते.

पोलिसांकडून मुलाची अन् सुनेच्याही चौकशीची शक्यता-

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर आणि सून डॉ. सोनाली वळसंगकर यांना चौकशीसाठी पोलीस बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिस डॉ. आश्विन वळसंगकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतील. मात्र, आतापर्यंत या प्रकारणात केवळ आरोपी मनीषा मुसळे-माने हिचीच चौकशी पोलिसांनी केली आहे. या चौकशीत नेमकं काय समोर आलं आहे, या बाबतीत कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. दरम्यान सखोल तपासानंतरच आम्ही निष्कर्षपर्यंत पाहोचू अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

संबंधित बातमी:

Shrish Valsangkar: रुग्णालय वळसंगकरांचं, चलती मनीषाची, तिच्याशिवाय काडीसुद्धा हलत नव्हती; सर्व कर्माचारीही घाबरायचे, कोण आहे मनीषा मुसळे-माने?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget