Shrish Valsangkar: रुग्णालय वळसंगकरांचं, चलती मनीषाची, तिच्याशिवाय काडीसुद्धा हलत नव्हती; सर्व कर्माचारीही घाबरायचे, कोण आहे मनीषा मुसळे-माने?
Dr. Shrish Valsangkar Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Dr. Shrish Valsangkar Solapur: सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shrish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान राहत्या घरातील बाथरुममध्ये स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी हॉस्पिटलमधील प्रशासन अधिकारी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने (Manisha Musale-Mane) (रा. सोलापूर) या महिलेस शनिवारी रात्री अटक करून रविवारी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी डॉ. आश्विन शिरीष वळसंगकर (45, रा. वळसंगकर हॉस्पिटल, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार संशयित आरोपी मनीषा मानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मनीषा मानेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ही महिला कोण आहे?, याबाबत चर्चा रंगली आहे.
कोण आहे मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने? (Who Is Manisha Musale-Mane)
वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्येच प्रशासकीय अधिकारी म्हणून मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने काम करत होती. शाळा कॉलेजला असतानाच मनीषा ही त्यांच्या दवाखान्यामध्ये कामाला लागली होती. कालांतराने डॉक्टर वळसंगकर यांच्या घरातली मनीषा सदस्य बनली. हॉस्पिटलमध्ये बघता बघता चांगल स्थान मिळवलं. डॉक्टर वळसंगकर यांच्यानंतर मनीषा हिचीच हॉस्पिटलमध्ये चलती होती. डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी स्टाफसुद्धा तिला घाबरुन होते. तिचे इतके प्रस्थ होते की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडीसुद्धा हलत नव्हती, अशी परिस्थिती होती. सामान्य घरातून आलेली आणि जवळपास 20 ते 25 वर्षे हॉस्पिटलमध्ये कामकाज बघून प्रमुखपद निभावत असलेली मनीषा हिचा बंगला पाहिल्यानंतर डोळे दिपल्याशिवाय राहत नाहीत असे समजते. मनीषा खूप वर्षापासून हॉस्पिटलचे कामकाज बघत आहे. शिवाय मनीषा आपल्या घरातील सदस्य असल्यासारखी असल्यामुळे तिला कामावरून काढू नये, म्हणून कुटुंबातील सदस्यांमध्येसुद्धा वाद होता. डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना तीने एक ई-मेल केला. त्यात तीने म्हटलेलं की ‘ मी इतक्या वर्षांपासून आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. पण आता अचानकपणे माझ्या पगार मध्ये कपात केली जात आहे. माझे अधिकार कमी जात आहेत. हे योग्य नाही जर हे असेच सुरू होणार असेल तर मी आत्मदहन करेन. तिच्या या ईमेल नंतर डॉक्टर वळसंगकर यांनी तिला हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. अशा आत्महत्येच्या धमकीच्या ईमेल मुळे डॉ. वळसंगकर यांना मानसिक त्रास झाला. त्यांनी तिला बोलावून समजावले देखील होते.
पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीत नेमकं काय?
- पोलीस ठाणे - सदर बझार पोलीस स्टेशन गुरनं. 365/2025 भा न्या सं कलम 108 प्रमाणे
- गुन्ह्याचा प्रकार - 12 संकीर्ण/ मृत्यूस कारणीभूत
- घटनेची तारीख व वेळ - दि.18/04/2025 रोजी चे 20.40 वा.चे सुमारास
- गुन्हा दाखल तारीख व वेळ - दि.19/04/2025 रोजी 22.09 वा.
- घटनास्थळ - 158 क, रेल्वे लाईन, सोलापूर
- फिर्यादीचे नाव व पत्ता- डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर, वय - 45 वर्ष, धंदा - डॉक्टर, राहणार - एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग,सोलापूर
- आरोपीचे नाव व पत्ता- मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर
गुन्ह्याची हकीकत- नमूद वेळी ,ठिकाणी व तारखेस यातील फिर्यादी यांनी आरोपीस वेळोवेळी सहकार्य करून देखील आरोपीने फिर्यादींवर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून राहते घरी स्वतःच्या बेडरूम मधील अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशील मध्ये गोळी घालून आत्महत्या केली व आरोपी हे फिर्यादीच्या वडीलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले म्हणून फिर्यादीची आरोपी विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.
कोण होते डॉ. शिरीष वळसंगकर?
- डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील प्रख्यात न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे.
- डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले.
- लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशाभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञामध्ये त्यांचा नावालौकीक होता.
- 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे.
- न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते.
- मेंदू विकार संदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत.
- कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले.
- लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली.
- वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते.
- देशातील विविध भागात ते याचं विमनाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमनिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केलंय.
























