Bihar Election 2025: बिहारमध्ये नितीशकुमारांची खूर्ची डळमळीत, पण महाआघाडीची 'तेजस्वी' चाल! मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा दिला, तर डेप्युटीसाठी..
Bihar Election 2025: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करताना अशोक गेहलोत म्हणाले, "सर्वांचे मत घेतल्यानंतर, आम्ही निर्णय घेतला आहे की तेजस्वी यादव या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील."

Bihar Election 2025: बिहार निवडणुकीच्या (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्यापूर्वी जागावाटपावरून सुरू असलेल्या मतभेदांमध्ये, महाआघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. महाआघाडीने तेजस्वी यादव यांना (Tejashwi Yadav CM candidate) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी महाआघाडी जिंकल्यास तेजस्वी यादव आणि मुकेश साहनी (Mukesh Sahani Deputy CM candidate) यांना अनुक्रमे मुख्यमंत्रीपदाचे आणि उपमुख्यमंत्रीपदाचे चेहरे म्हणून घोषित केले आहे.
तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा (Mahagathbandhan press conference)
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करताना अशोक गेहलोत म्हणाले, "सर्वांचे मत घेतल्यानंतर, आम्ही निर्णय घेतला आहे की तेजस्वी यादव या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील." अशोक गेहलोत पुढे म्हणाले की मुकेश साहनी हे उपमुख्यमंत्रीपदाचे चेहरा असतील.अशोक गेहलोत म्हणाले, "देशाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काळजी करणे महत्त्वाचे आहे. देश कुठे चालला आहे हे कोणालाही माहिती नाही. देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. या काळात देशाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य लोक, विद्यार्थी आणि तरुणांचीही परिस्थिती अशीच आहे. जेव्हा हे घडते तेव्हा लोकांना बदल हवा असतो आणि यावेळी बदल घडेल. जनतेने कसा प्रतिसाद दिला हे संपूर्ण देशाने पाहिले."
VIDEO | Bihar Assembly Elections 2025: RJD leader and Mahagathbandhan’s CM candidate Tejashwi Yadav (@yadavtejashwi), addressing the joint press conference, said:
— Press Trust of India (@PTI_News) October 23, 2025
"We want to tell you all that the accusations made by the BJP about jungle raj are baseless. Today, crime in Bihar… pic.twitter.com/AuQliq7K3t
तर आपण 30 वर्षांत जे केले नाही ते पूर्ण करू
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, "आपल्याला बिहारच्या उभारणीसाठी काम करावे लागेल. आदरणीय लालू प्रसाद यादव, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व महाआघाडीतील भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आम्ही नक्कीच पालन करू." एनडीएवर निशाणा साधत ते म्हणाले, "हे लोक थकले आहेत, ते फक्त सत्तेसाठी भुकेले आहेत. जर आपल्याला 30 महिने संधी मिळाली तर आपण 30 वर्षांत जे केले नाही ते पूर्ण करू."
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या नेत्यांचे आभार मानत म्हटले की, "आम्ही महाआघाडीचे लोक केवळ सरकार स्थापन करण्यासाठी नव्हे तर बिहार बांधण्यासाठी एकत्र आलो आहोत." तेजस्वी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांचे आभार मानले. त्यांनी लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्यासह इतर महाआघाडीच्या नेत्यांचेही आभार मानले.
एनडीए नितीश कुमारांवर अन्याय करत आहे
तेजस्वी यादव यांनी आरोप केला की एनडीए नितीश कुमारांवर अन्याय करत आहे. एनडीएच्या निवडणूक प्रचारात नितीश कुमारांचा चेहरा का वापरला जात नाही असा प्रश्न तेजस्वी यांनी केला. नितीश कुमार यांचे नाव अधिकृतपणे जाहीर न करणे देखील अन्याय्य आहे असे त्यांचे मत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























