Satish Bhosale Arrested: सुरेश धसांनी कृष्णा आंधळेचा अंदाज वर्तवला, मात्र कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडला!
Satish Bhosale Arrested: सतीश भोसले गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आज बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या आहेत.

Satish Bhosale Arrested: सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून आज अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस आणि उत्तरप्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या हा भाजपचे बीडमधील आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेने केलेले मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर सतीश भोसले गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आज बीड पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या आहेत.
सुरेश धसांनी 'माझा कट्टा'वर कृष्णा आंधळेचा वर्तवला होता अंदाज-
सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे कुंभमेळ्यात असू शकतो, असा अंदाज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात वर्तवला होता. मात्र आता कुंभमेळ्यात त्यांचाच पठ्ठ्या खोक्या सापडल्याचं पाहायला मिळतंय.
सुरेश धस नेमकं काय बोलले होते?
कृष्णा आंधळेची हत्या झाली असू शकते का?, असा सवाल सुरेश धस यांना एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावर सुरेश धस माझा कट्टावर बोलताना म्हणाले होते, कृष्णा आंधळेची हत्या कशाला कोण करेल, संतोष देशमुख हत्याकांडात सर्वांचे रोल फिक्स झाले आहेत. वाल्मिक कराडचा रोल काय, सुदर्शन घुलेचा रोल काय, प्रत्येकाचा रोल काय, केदारचा काय, आंधळेचा काय, हे सगळ्यांचे रोल फिक्स झालेले आहेत. तो जरी बोंबलत किती दिवस फिरत राहिला, तरी पोलिसांच्या पंजाच्या पलीकडचा तो नाही.
...तिकडे कुंभमेळ्यात जाऊन , केस वगैरे काढून बसले असतील- सुरेश धस
पोलीस त्याला पकडतील परंतु मी अगोदर शब्द वापरला की ही सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे असं वापरत नाही. पण साधारणतः आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो, अशा काही घटनांमध्ये पिढीत आमच्याबरोबर आमच्यासमोर येतात. म्हणून सरकारी वकील देणार असो किंवा स्वतंत्र वकील देणं असो यासाठी म्हणून आम्हाला याच्यामध्ये मध्यस्थीवर काही वेळा करावे लागते. त्यात एकंदरीत चित्र असे ज्या प्रकरणा कोणत्याही खून प्रकरणांमध्ये एखादा तरी आरोपी हा सजा डिक्लेअर होईपर्यंत सुद्धा सापडत नाही तशा प्रकारचा हा जो आहे कृष्णा आंधळे हा वेष बदलून, नाहीतर हे काय सांगावे हरिद्वारला सुद्धा गेला असेल तिकडे कुंभमेळ्यात जाऊन , केस वगैरे काढून बसले असतील . कपडे बदलून साधू संत होईल असा नाही.पण तो सापडेल, असं सुरेश धस माझा कट्टावर म्हणाले होते.
संबंधित बातमी:
खोक्याला प्रयागराजमधून अटक, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

