एक्स्प्लोर

सापळा रचला... झडती घेतली, आरोपीकडे सापडल्या 17 लोखंडी तलवारी; विटा पोलिसांची कारवाई

Sangli Crime: सांगलीतील विटामध्ये पोलिसांनी 17 तलवारी विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

Sangli Crime News: सांगलीच्या विटामध्ये तलवार विक्री करणाऱ्या एका तरुणाला विटा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 17 हजार रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. भगतसिंह शीख असं या तरुणाचं नाव आहे. तासगाव-आळसंद रोडवर विटा पोलिसांनी सापळा रचून तलवार विक्री करत असताना त्याला पकडलं आहे. सदर तरुण सांगली शहरात राहत असल्याचं समोर आलं असून त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी भगतसिंह शिखला न्यायालयासमोर हजर केलं असता 14 जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. पण नेमकं इतक्या संख्येनं तलवारी कशासाठी खरेदी केल्या जात होत्या आणि कुठे नेल्या जात होत्या? याचा तपास केला जात आहे. 

तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक व्यक्ती तलवार विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटारसायकलवरुन येत असल्याचं आढळून आलं. तिच्यावर संशय आल्यानं संबंधित व्यक्तीचा पाठलाग करुन तिला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. 

दरम्यान, त्याच्याजवळील एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 17 हजार रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी सापडल्या. या तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता, त्यानं या तलवारी विक्रीसाठी आणल्याचं स्पष्ट झालं. याबाबतची कबुली आरोपी भगतसिंहनं दिली. सध्या वेगवेगळ्या शहरांत घडणाऱ्या घडामोडी आणि एकूणच राज्यातील सामाजिक वातावरण पाहून जिल्हा पोलीस दलानं सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्ह्याच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये शस्त्र बंदी आदेशाप्रमाणे शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका इत्यादी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास किंवा बाळगण्यास मनाई आदेश केले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी ही कारवाई केली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget