एक्स्प्लोर

जुन्या वादातून पाच अल्पवयीन मुलांकडून कब्बडीपटूला संपवलं, कोयत्यानं सपासप वार, आरोपी गजाआड

काही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. याच वादातून

Sangli Crime News : सांगली : सांगली शहरातील जामवाडी मधील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरूणाचा निघृणपणे संपवण्यात आलं आहे. तरुणाच्या डोक्यात कोयत्यानं वार करुन त्याची निघृण हत्या करण्यात आली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाचजणांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे.                     

सांगलीतील (Sangli Crime) जामवाडी (Sangli Jamwadi) येथे राहणारा 22 वर्षीय अनिकेत तुकाराम हिप्परकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रीय होता. तसेच, तो कब्बडीपटू देखील होता.                           

काही महिन्यांपूर्वी हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्यानं एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग मुलांनी मनात ठेवला होता. जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत थांबला होता. त्यावेळी संशयित अल्पवयीन मुलं तिथे आली. त्यांनी पूर्वी झालेल्या वादाचा जाब त्याला विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद एवढा वाढला की, अगदी विकोपाला गेला. त्यानंतर संशयित दोन मुलांनी अनिकेतवर दोन कोयत्यांनी सपासप वार केले.              

नेमकं घडलं काय?                           

कोयत्याचे वार वर्मी बसल्यानं अनिकेत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर संशयित मुलांनी अनिकेतला तिथेच सोडून पळ काढला. या खुनी हल्ल्याची माहिती मिळताच उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच, तात्काळ संशयितांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. 

आरोपीचा श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर कर्नाळ रस्त्याकडे पळाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला. काही वेळातच पाचही संशयित पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सध्या पोलीस सखोल शोध घेत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dombivli Crime : ज्या मुलांसोबत खेळत होती, त्यांच्या वडिलांकडून चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
Embed widget