एक्स्प्लोर

Rupali Patil Thombare : रूपाली चाकणकरांचा या प्रकरणाशी काही संबंध नसता तर...; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं फरार पोस्टमागचं कारण, खरातसोबत सहआरोपीही करण्याची मागणी

Rupali Patil Thombare : भोंदू बाबांना साथ दिली आहे आणि महिलांचा बलात्कार देखील घडवून आणलाय, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे.

पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेणारा) याच्या अटकेनंतर रूपाली चाकणकरांसह अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचाच राजीनामा दिला पाहिजेच पण त्यांना पक्षातून देखील बाहेर काढले पाहिजे अशी मागणी रूपाली ठोंबरे यांनी केली आहे. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसता तर त्या आपल्यासमोर येऊन बोलल्या असत्या. त्यामुळे त्या फरार असल्याचे फेसबुक पोस्ट मी केली आहे. त्यांनी भोंदू बाबाला साथ दिली आहे आणि महिलांचा बलात्कार देखील घडवून आणलाय, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombare) यांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे. 

भोंदू बाबांना पाणी पुरवण्यापासून तर बायका पुरवण्यापर्यंत सगळं काम चाकणकर यांनी केले. चाकणकरसारख्या महिला जर पक्षात असतील तर बाकी महिलाही काम करायला जरा घाबरतील. मलाही विचार करावा लागेल. विखे पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे भोंदू बाबा सोबतचे फोटो पाहिले पण ते काय पाय धुवायला गेले नाहीत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना मी रीतसर निवेदन देणार आहेत आणि राजीनामाची मागणी देखील करणार आहे. संपदा मुंडे प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा राजीनामा अजित पवारांनी मागवला होता, मात्र त्यावेळी सुनील तटकरे यांनी तो राजीनामा घेऊ दिला नाही. रूपाली चाकणकरांना कोण पाठीशी घालत आहे हे येत्या काही दिवसातच समोर येईल, असंही रूपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांना 'सह-आरोपी' करण्याची मागणी केली आहे.नाशिकच्या अशोक खरात (भोंदू बाबा) प्रकरणाशी रुपाली चाकणकर यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला आहे. खरातच्या संस्थेवर त्या सदस्य आहेत आणि या गुन्ह्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे त्यांना या प्रकरणात 'सह-आरोपी' करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप

एका वर्षापूर्वी जेव्हा 'खबरदार पुढारी' या स्थानिक वृत्तपत्राने खरातचा भांडाफोड केला होता, तेव्हा रुपाली चाकणकर यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवरून त्या पत्रकाराला धमकी दिली होती आणि जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला होता, असा दावा ठोंबरे यांनी केला. "चाकणकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महायुती सरकार आणि संपूर्ण महाराष्ट्र बदनाम होत आहे. त्यामुळे त्यांना केवळ महिला आयोगावरूनच नाही, तर पक्षातूनही बाहेर काढावे," असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

गंभीर स्वरूपाचे रॅकेट आणि पुरावे

संविधानिक पदावर बसून महिलांवर अत्याचार करण्यासाठी भोंदू बाबाला मदत केली जात आहे. खोट्या महिला उभ्या करणे, व्हिडिओ बनवणे आणि ब्लॅकमेलिंग करणे असे हे मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खरातच्या संस्थेला पाणी मिळावे म्हणून महिला आयोगाकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता, असाही एक पुरावा त्यांनी दिला. 

नेत्यांची पाठराखण आणि ५८ व्हिडिओंचा उल्लेख

याआधी संपदा मुंडे प्रकरणात अजित दादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, पण सुनील तटकरे यांनी तो थांबवला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. खरात प्रकरणातील ५८ व्हिडिओंमध्ये कोणकोणते नेते आहेत, हे लवकरच समोर येईल आणि ते सर्व सह-आरोपी होतील, असा इशाराही त्यांनी दिला. खरातचे पुण्यातील घर कुठे आहे, त्याचे धायरी किंवा खडकवासला भागातील कनेक्शन काय आहे, याचे पुरावे दोन दिवसांत सादर करणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget