एक्स्प्लोर

Rupali Chakankar On Asha Mirge Ashok Kharat Case: संपूर्ण वस्त्रातील स्त्रीला विवस्त्र करणाऱ्या विकृत प्रवृत्तीविरुद्ध एल्गार; रुपाली चाकणकर आक्रमक, आशा मिरगेंना धडाधड नोटीसा

Rupali Chakankar On Asha Mirge Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आशा मिरगे यांच्याकडून गंभीर आरोप केले होते.

Rupali Chakankar On Asha Mirge Ashok Kharat Case: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आशा मिरगे (Asha Mirge) यांना नोटीस धाडली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) आशा मिरगे यांच्याकडून गंभीर आरोप केले होते. त्याअनुषंगाने रुपाली चाकणकरांकडून आशा मिरगेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वत: रुपाली चाकणकरांनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसिद्ध करुन दिली. 

अशोक खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खराताच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वये माझा संबंध नव्हता, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. मी कधी कोणत्याही महिलेला खरातकडे घेऊन गेलेली नाही. ना माझा अक्षेपहार्य फोटो व्हिडीओ होता. पण तरीसुद्धा गेली दीड-दोन महिने अतिशय अश्लील, असभ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावर केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते. आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे, असं रुपाली चाकणकरांनी सांगितले. (Rupali Chakankar On Ashok Kharat Case)

AI चा वापर करून व्हिडीओ बनवले- रुपाली चाकणकर (Rupali Chakankar On Asha Mirge)

इतरांप्रमाणेच माझ्या कुटुंबीयांनी खरातला गुरु मानलं होतं. आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडीओ होता, तो अतिशय जुना व्हिडिओ होता. त्यावेळेस मी आयोगाची अध्यक्षही नव्हते. पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेश अध्यक्षपदाच्या या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, AI चा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडीओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून. आणि म्हणून आशा मिरगे यांनी डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगे यांना पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दोनदा ही नोटीस परत घरी पाठवली. एकूण तीन वेळा नोटीस पाठवली गेली पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही. अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. 

संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला- रुपाली चाकणकर (Rupali Chakankar On Asha Mirge)

माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेंना 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे. त्यावेळेस मी देखील हजर असेलच. कारण की हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे. यामध्ये आशा मिरगेंप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली. सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले. कोणताही पुरावा त्या सादर करू शकल्या नाहीत. त्या सगळ्यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे. माझा हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा. इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत, यासाठी हा लढा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईचा महाराष्ट्र. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला. आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे. ही लढाई मी निश्चितपणाने लढेल. पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आज ही सांगते, सत्य प्रखरतेने तुमच्यासमोर आहे. कोणताही पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य, गैरकृत्य कधीही केलेलं नाही. इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती. आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढतीये. 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हजर राहा...मी देखील स्वतः माझगाव कोर्टात असेल, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. 

आशा मिरगे रुपाली चाकणकरांबाबत काय काय म्हणाल्या होत्या? (Asha Mirge On Rupali Chakankar)

रुपाली चाकणकर या असंख्य महिलांना अशोक खरातकडे घेऊन जायच्या असा गौप्यस्फोट आशा मिरगे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. कुंपणच शेत खाते असं आपण ऐकलं होतं. पण इथं कुंपणच आख्ख शेत लांडग्यापुढे टाकतंय असा प्रकार घडला असा आरोप आशा मिरगे यांनी रुपाली चाकणकरांवर केला. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना कुठल्याही महिलेल्या आपल्या वाटल्या नाहीत, त्यांची उठबस नेहमी मंत्र्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये असायची असं मिरगे म्हणाल्या.  अशोक खरातसोबत संबंध ठेवणाऱ्यांमध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. त्यामध्ये त्यांचे काही मित्रदेखील आहेत. काही लोक अशोक खरातचे पार्टनर असून त्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांचा नंबर येतो, असा आरोपही आशा मिरगेंनी केला होता. रुपाली चाकणकरांचा ड्रेसिंग सेन्स, त्यांचा मेक अप, ग्लॅमर पाहून अनेक महिलांना कॉम्प्लेक्स व्हायचा. या महिलेचा वावर हा सतत मंत्री, अधिकारी यांच्यासोबतचा असायचा. त्या सतत राजकारण करायच्या. त्यामुळे कुणालाही त्या आपल्या वाटल्या नाहीत, असंही आशा मिरने म्हणाल्या होत्या. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget