सहीसह ऑफर लेटर आलं, 20 हजार मानधनही दिले; रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालयात गेला, तिथे जे कळलं ते ऐकून धक्काच बसला!
Job Fraud: रेल्वेमध्ये भरती करून घेत जवळपास सहा महिने प्रशिक्षण देखील दिले गेले. आठ लाख रुपये प्रत्येकी कॅश स्वरूपात घेऊन या सर्व तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक: नोकरीचे (Job Fraud) आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र थेट रेल्वेत नोकरी (Railway Job) लावून देण्याच्या आमिषाने कोटींचा गंडा घालून नाशिक, पुणे, सोलापूर येथील बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या 62 बेरोजगारांना सहा कोटी रुपयांना गंडवल्याची माहिती समोर आली आहे. खाजगी तिकीट एजंट समवेत प्रशिक्षण देऊन कोलकत्यात नोकरी लावून बदलीसाठी प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याची माहिती फसवणूक झालेल्या (Nashik News) तरुणांच्या नातेवाईकांनी दिली.
नाशिक, पुणे, सोलापूर येथील बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवण्यात आले. कोलकत्यात सहा महिने निवड झालेल्या युवकांना प्रशिक्षणही देण्यात आले. सहा महिने प्रशिक्षण आणि प्रत्येकी वीस हजार रुपये तीन महिने मानधन देखील दिले गेले. त्यानंतर रेल्वे नोकरीचे बोगस नियुक्त पत्र देऊन विश्वासही संपादन करून घेतला. एवढच नाही तर या सर्व तरुणांना बोगस ऑफर लेटर आणि नियुक्ती पत्र ही दिली गेली. कोलकत्यात सहा महिने प्रशिक्षण दिले आणि वीस हजार रुपये मानधन ही देत रेल्वे स्थानकांवर तात्पुरती नियुक्ती दिल्याचे दाखवले. मात्र या फसवणूक झालेल्या पंचवीस उमेदवारांनी रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालयात वेतनाची मागणी केली आणि त्यांना अशी कोणतीही भरती झालीच नाही असे सांगण्यात आले. मात्र या तरुणांची फसवणूक झाल्याची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर फसवणूक करणाऱ्या सात भामट्यांविरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वीरेश वाबळे राहणार जेलरोड असे या तक्रारदाराचे नाव आहे.
25 तरुणांना बोगस नियुक्तीपत्र
नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या संशयीतांपैकी रमण सिंग याने या बेरोजगारांच्या पालकांना नोकरीचे आमिष दाखवले होते. उर्वरित संशयतांनी रेल्वेत अधिकारी असल्याचे देखील भासवले आणि पैशांची मागणी केली. तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 62 जणांची ही फसवणूक झाल्याचं पोलिसांनी सांगितले. विश्वास बसावा यासाठी संशय त्यांनी 25 तरुणांना बोगस नियुक्तीपत्र दिले आणि कोलकत्यात खाजगी तिकीट एजंट समवेत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिल्याचे देखील भासवले. त्यासाठी प्रत्येकी वीस हजार रुपये मानधनही या निवड झालेल्यांना कॅश स्वरूपात देण्यात आले. फसवणूक झाल्यानंतर तक्रारीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी अधिक माहिती दिली.
रेल्वेमध्ये अधिकारी असल्याचे भासवून या तरुणांची फसवणूक
वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नामुळे अनेक सुशिक्षित तरुण आणि तरुणींना नोकरीच्या आमिष दाखवून गंडवले जातय. असाच प्रकार घडलाय राज्यातील नाशिक पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात. नाशिकच्या जवळपास 62 तरुण आणि तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून गंडवले गेले. रेल्वेमध्ये भरती करून घेत जवळपास सहा महिने प्रशिक्षण देखील दिले गेले. आठ लाख रुपये प्रत्येकी कॅश स्वरूपात घेऊन या सर्व तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या सर्व तरुणांनी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यासोबतच नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रेल्वेमध्ये अनेक ठिकाणचे अधिकारी असल्याचे भासवून या तरुणांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आल्याने सर्वच ठिकाणी आश्चर्य व्यक्त केल जात आहे. फसवणूक केल्यानंतर रेल्वे प्रशासन आता नेमकी या संदर्भात काय पावल उचलणार आणि फसवणूक करणाऱ्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाणार हे बघ ना महत्त्वाचा असणार आहे.
हे ही वाचा :
Pune Crime : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले तब्बल 50 लाख; पुण्यातील धक्कादायक प्रकार