एक्स्प्लोर

Crime : 'वर्क फ्रॉम होम' नोकरी द्यायचा, परदेशातून कमवत होता 'म्होरक्या', 23 राज्यातील 160 जणांची कोट्यवधींची फसवणूक

Punjab Crime : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचे रॅकेट चालवणारा म्होरक्या हा परदेशातून क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे मिळवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Punjab Crime : 'वर्क फ्रॉम होम'(Work From Home) नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पंजाब पोलिसांनी (Punjab Police) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने तब्बल 23 राज्यातील 160 लोकांची फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य म्होरक्या परदेशात बसला आहे, ज्याला क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे पाठवले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोठ्या टोळीचा पंजाब पोलिसांकडून पर्दाफाश, एका महिलेची 25 लाखांची फसवणूक

पंजाबचे पोलिस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी सांगितले की, घरातून नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून चार सायबर गुन्हेगारांना अटक करून ऑनलाइन नोकरीच्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईम पोलीस अधिकारी व्ही. नीरजा यांनी सांगितले की, या प्रकरणी एका महिलेची गुंडांनी 25 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सायबर क्राईम पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता ही टोळी आसाममधून कारवाया करत असल्याचे आढळून आले.

देशभरात सायबर फसवणुकीचे रॅकेट

पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, आरोपी हे लोकांना टेलीग्राम ॲपद्वारे घरून कामाचे आमिष दाखवून अडकवायचे. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, फसवणूक करणारे त्यांना सुरुवातीला छोटी कामे देत आणि त्या बदल्यात काही पैसेही पाठवायचे. यानंतर मोठ्या परताव्याच्या आमिषाने, तसेच वेगवेगळ्या बहाण्याने पैसे जमा करण्यास सांगायचे. पोलिसांनी सांगितले की, या निमित्ताने पंजाब पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा सुगावा हाती लागला असून ज्यामुळे देशभरात पसरलेल्या सायबर फसवणुकीचे रॅकेट उघड झाले आहे.

आसाममधून चार जणांना अटक

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, जहीरुल इस्लाम, रफीउल इस्लाम, मेहबूब आलम आणि अजीजुर रहमान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ज्यापैकी जहीरुल इस्लाम आणि रफीउल इस्लाम या आरोपींना आसामच्या नागाव जिल्ह्यातून अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून दोन स्वाइप मशीन, दोन बायोमेट्रिक स्कॅनर, एक आय स्कॅनर, एक फिंगरप्रिंट स्कॅनर, 38 पॅन कार्ड, 32 डेबिट आणि क्रेडिट कार्ड, 16 सिमकार्ड, 10 मतदार कार्ड, नऊ आधार कार्ड, 10 बँक खाते पासबुक/चेक बुक जप्त केले. तसेच त्यांच्याकडून पाच सरकारी स्टॅंप, पाच मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन पेन ड्राईव्ह आणि एक ओळखपत्रही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांनी ऑनलाइन सेवा देण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र चालवले, त्यातून झटपट पैसे कमावले, पॅन कार्ड, मतदार कार्ड आणि आधार कार्ड बनवण्यासाठी लोकांच्या कागदपत्रांचा वापर केला. या फसवणुकीसाठी त्याने एका सॉफ्टवेअरचा वापर केला. तर गुवाहाटी येथून अटक करण्यात आलेल्या मेहबूब आलमने कमिशनच्या आधारे अजीजूर रहमानला बँक खाती उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले. आसाममधील मोरीगाव जिल्ह्यातून अजीजूर रहमानला अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत 23 राज्यातील 160 जणांची फसवणूक 

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने आतापर्यंत 23 राज्यातील 160 जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचे रॅकेट चालवणारा म्होरक्या हा परदेशातून क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे मिळवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा>>>

MP Crime : नायजेरियन आरोपी ठरला पोलिसांचा पाहुणा! जेलमध्ये ठेवणे पडले महागात, पोलिसांना बसला 5 लाख रुपयांचा फटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget