Pune Rave Party and Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, महिला आयोगाचं पोलीस महासंचालकांना पत्र
Pune Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणात रुपाली चाकरणकरांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

Pune Rave Party: मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी, असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहेत. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ आणि फोटो आढळले होते. त्यामुळे हे सगळं मानवी तस्करीचा प्रकार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. आता याच प्रकरणी त्यांनी थेट पोलीस महासंचालकाला पत्र देत सखोल चौकशी करुन महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल आणि ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी. पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव टाकून या महिलांना पार्टीसाठी बोलवण्यात आलंय का?, याच्या चौकशीची मागणीदेखील पत्राद्वारे केली आहे. त्यासोबतच महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करण्याच यावी, असे महिला आयोगाने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यानी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. सदर प्रकरण, केवळ एका पार्टीपुरते मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटीत गुन्हेगारी असून अतिशय भयावह व घातक परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे. ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते. महिलांचा सन्मान, सुरक्षितता आणि हक्कांचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसेच कायदयानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभुमीवर विशेष तपास पथकाची स्थापना करुन प्रकरणी न्यायोचित, सखोल चौकशी वेळेत व्हावी, असे पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात श्रीमती रूपाली चाकणकर यांनी नमूद केले आहे. महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी व्हावी. तपासाअंती दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल असे कळविण्यात आले आहे.
State Women Commission: महिला आयोगाने कोणत्या गोष्टींची चौकशी करायला सांगितलं?
- आरोपीकडून 28 वेळा रुम बुकिंग करण्यामागील हेतू आणि संघटित नेटवर्क तपास व्हावा.
- मानवी तस्करी प्रतिबंध पथक (AHTU) कडून महिलांना कशाप्रकारे आणले गेले. फसवणूक, दबाव किंवा इतर कोणतेही माध्यम महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल व ओळख दस्ताऐवजांची खातरजमा व्हावी.
- आरोपीचे मोबाईल, ई-मेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स यांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
- हॉटेल व्यवस्थानपाची सखोल चौकशी व्हावी.
- एसआयटीमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करुन चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी.
- चौकशीनुसार दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन भविष्यात अशाप्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल.
आणखी वाचा
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्वि्स्ट; प्रांजल खेवलकरांच्या तपासाचा अहवाल रुपाली चाकणकरांकडे जाणार























