एक्स्प्लोर

Pune Crime : गोव्याची सव्वा कोटीची दारू सिंगापूरमध्ये जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, पुरंदरमध्ये गुन्हा दाखल

Goa Liquor Seized In Singapur : गोव्यातून हा एवढा मोठा दारूचा साठा कोणी पाठवला आणि तो कुठे वितरित केला जाणार होता याचा तपास आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.

Goa Liquor Seized In Purandar : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला, परंतु महाराष्ट्रात विक्रीसाठी पूर्णपणे प्रतिबंधित असलेला तब्बल 1कोटी 27 लाख 54 हजार 600 रुपयांचा विदेशी मद्यसाठा पुरंदर पोलिसांनी आणि उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत एका मोठ्या सहाचाकी कंटेनरसह लाखो रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून या मोठ्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.

Singapore Village Raid : संशयास्पद कंटेनर अडवला; 180 मिलीचे 1290 बॉक्स जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोवा राज्य निर्मित मद्याची महाराष्ट्रात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे सासवड पथकाने पुरंदर तालुक्यातील बेलसर-वाघापूर मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी सुरू केली होती.

नाकाबंदी सुरू असतानाच सिंगापूर गावच्या हद्दीत असलेल्या 'हॉटेल दोस्ती'समोर एक संशयित सहाचाकी कंटेनर आला. पथकातील जवानांनी कंटेनर थांबवून वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना अत्यंत संशयास्पद उत्तरे दिली.

चालकाच्या बोलण्यावर संशय आल्याने जवानांनी संपूर्ण वाहनाची सखोल तपासणी केली. या तपासणी दरम्यान कंटेनरच्या आत लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित 'रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की' (Royal Blue Malt Whisky) या नामांकित ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या बाटल्यांचे तब्बल 1290 बॉक्स आढळून आले.

State Excise Department Action : 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त; एक तस्कर अटकेत

जप्त करण्यात आलेल्या या अवाढव्य मद्यसाठ्याची निव्वळ बाजारपेठ किंमत 1 कोटी 11 लाख 45 हजार 600 रुपये इतकी आहे. याशिवाय, दारूची बेकायदेशीर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला  'एलपीटी-1615' (Tata LPT-1615) मॉडेलचा सहाचाकी कंटेनर, दोन महागडे मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 1 कोटी 27 लाख 54 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल शासनाने जप्त केला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली असून, गोव्यातून हा एवढा मोठा दारूचा साठा कोणी पाठवला आणि तो महाराष्ट्रात कुठे वितरित केला जाणार होता, याचा सखोल तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सासवड पथक करत आहे. या मोठ्या कारवाईमुळे मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

ही बातमी वाचा: 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Embed widget