एक्स्प्लोर

Pune Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं, मग थेट खोटी वर्दी; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'ला बेड्या, घराची झाडाझडती अन् पोलीसही चक्रावले!

Pune Crime News: पुण्यातील लष्कर पोलिसांनी 25 वर्षीय तोतया "लेडी सिंघम"ला कॅम्प परिसरातून अटक केली असून तिच्या कारनाम्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime News: पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले... पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका तरुणीने थेट पोलिसांचा गणवेशच परिधान केला. अंगावर खाकी, खांद्यावर स्टार आणि रुबाबदार वावर... पण ही खरी पोलीस अधिकारी नसून तोतया "लेडी सिंघम" (Fake Police) असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील लष्कर पोलिसांनी (Lashkar Police) या 25 वर्षीय तरुणीला कॅम्प परिसरातून अटक केली असून तिच्या या कारनाम्यामुळे पुणे (Pune Crime News) शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Crime News: लष्कर पोलिसांच्या सतर्कतेमुळे भांडाफोड

पुण्यातील कॅम्प परिसरात पोलिसांच्या वर्दीत वावरणारी ही तरुणी पाहून अनेकांना ती खऱ्या अर्थाने पोलीस अधिकारी असल्याचं वाटत होतं. मात्र तिचा हा खाकी रुबाब फार काळ टिकला नाही. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे आहे. आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) दर्जाचा गणवेश परिधान करून नागरिकांवर प्रभाव आणि रुबाब पाडत होती. मात्र, लष्कर पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तोतया महिला पोलिसाचा भांडाफोड झाला.

Pune Crime News: अशी झाली कारवाई

6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कॅम्प परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एका खाजगी क्लिनिकबाहेर पोलिसांच्या वर्दीत उभी असलेली ही तरुणी त्यांच्या नजरेस पडली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पीएसआय शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिची चौकशी सुरू केली. "तू कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेस? तुझे आयडी कार्ड कुठे आहे?" अशा पोलिसी प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच संबंधित तरुणीची बोलती बंद झाली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, ती खोटी पोलीस असल्याचे उघड झाले. या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस उपआयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे.

Pune Crime News: वर्दी घालण्यामागचे धक्कादायक कारण

पोलीस तपासात या प्रकरणाची आणखी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे. आरोपी समिनाला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, तिथे गर्दी असल्याने तिला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि आपण पोलीस अधिकारी असल्याचा आव आणत क्लिनिकच्या रिसेप्शनवर दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime News: घराच्या झडतीत सापडल्या अनेक वर्द्या

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी समिनाच्या घराची झडती घेतली असता, तिथे पोलिसांचे आणखी काही गणवेश (वर्द्या) आढळून आले आहेत. त्यामुळे यापूर्वीही तिने अशाच प्रकारे कुणाची आर्थिक किंवा अन्य फसवणूक केली आहे का? किंवा पोलीस असल्याचे सांगून कुणाला धमकावून काही बेकायदेशीर लाभ घेतला आहे का? याचा आता गुन्हे शाखेच्या मदतीने सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीनुसार, समिनाचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, अपूर्ण राहिलेले स्वप्न खोट्या मार्गाने पूर्ण करण्याच्या नादात तिने कायद्याचाच भंग केला आणि अखेर खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News: लग्न झालं अन् दोन महिन्यातच समजलं बायकोचं अफेअर, पत्नीसह तिच्या प्रियकरानं त्याच्यासोबत नको ते केलं, सोलापुरातील तरुणाने संपवलं जीवन
लग्न झालं अन् दोन महिन्यातच समजलं बायकोचं अफेअर, पत्नीसह तिच्या प्रियकरानं त्याच्यासोबत नको ते केलं, सोलापुरातील तरुणाने संपवलं जीवन
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Solapur Crime News: 9 वर्षांच्या चिमुरडीला शाळेत जाताना जबरदस्तीने पळवलं; दगडाच्या खाणीत मारहाण अन् अत्याचार, 2004ची घटना, कोर्टाने दिली मृत्यू होईपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय प्रकरण?
9 वर्षांच्या चिमुरडीला शाळेत जाताना जबरदस्तीने पळवलं; दगडाच्या खाणीत मारहाण अन् अत्याचार, 2004ची घटना, कोर्टाने दिली मृत्यू होईपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय प्रकरण?
Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त कधीतरीच का दिसतो निमिष कुलकर्णी? अभिनेत्यानं सांगितलं कारण, खंत व्यक्त करत म्हणाला ..
Moshi Building Collapse: आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव
आमदार, मंत्र्यांचे नुसतेच दौरे, जबाबदारी कोणी घेणार का? मोशी दुर्घटनेतील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट; अतिरिक्त आयुक्तानां घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget