(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : मुलीला त्रास देणाऱ्याला महिलेकडून मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
मुलीला त्रास देतो म्हणून महिलेने तरुणाला बेदम चोप दिला. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला
पुणे : मुलीला त्रास देतो म्हणून महिलेले तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज (17 मार्च) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रद्युम्न कांबळे असं या मृत तरुणाचं नाव असून तो 22 वर्षांचा होता. पुण्यातील शिवणे परिसरात ही घटना घडली. वारजे पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिला, तिचा मुलगा आणि मुलाचा मित्र अशा तिघांना अटक केली आहे.
शिवणेमधल्या दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट इथे असलेल्या साई श्रद्धा रेसिडन्सीमधील वंदना विजय पायगुडे या महिलेच्या मुलीला प्रद्युम्न कांबळे नावाचा तरुण त्रास देत असल्याचा आरोप आहे. हा तरुण बुधवारी (16 मार्च) दुपारी मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. यावेळी मुलीच्या आईने प्रद्युम्नला घरात का आला यावरुन जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर वंदना पायगुडे यांनी प्रद्युम्नला घरात कोंडून दांडक्याने मारहाण केली. या मारहणात तो जखमी झाला होता. त्याच अवस्थेत तो मुलीच्या घरातून निसटून पळाला. यानंतर वंदना पायगुडे यांनी त्याचा पाठलाग करून दांगट पाटील नगर इथल्या रस्त्यावर त्याला दोन तरुणांच्या मदतीने मारहाण केली. हे दोन तरुण म्हणजे संबंधित महिलेचा मुलगा आणि मुलाचा मित्र.
या मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दोघे जण तरुणाला मारहाण करुन रिक्षामधून पळून गेले, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिसांनी जखमी प्रद्युम्न कांबळेला उपचारांसाठी वारजे माळवाडी इथल्या माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यानच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. वारजे पोलिसांनी या प्रकरणी संबंधित महिला, तिचा मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली.
Latur : महिला पोलिसाचा रुद्रावतार, गुंडाची पोलीस ठाण्यापर्यंत वरात
Nagpur : धक्कादायक! 23 वर्षीय तरुणीची जाळून हत्या, नागपुरातील घटनेने खळबळ
Thane Crime : वडिलांसह मुलीनं संपवलं जीवन; चिठ्ठीत पोलीस अधिकाऱ्याचं नाव, पोलीस दलात खळबळ