Pune Yerwada jail News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वरगळ्यानं दोन गटांत तुफान हाणामारी
येरवडा कारागृहातील कैंद्यांच्या हाणामारी संपायचं नाव घेत नाही आहे. कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन न्यायालयीन कैदी जखमी झाले आहेत.
![Pune Yerwada jail News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वरगळ्यानं दोन गटांत तुफान हाणामारी Pune Crime News clash broke out between two groups of inmates in pune yerwada jail Maharashtra Pune Yerwada jail News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वरगळ्यानं दोन गटांत तुफान हाणामारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/02/b0465acb65419bf98c893c7ad71cb5101680420483699442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Yerwada jail News : येरवडा कारागृहातील (Yerawada Central Jail) कैद्यांच्या हाणामारी ( Yerwada Jail) संपायचं नाव घेत नाही आहे. कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन न्यायालयीन कैदी जखमी झाले आहेत. हरीराम गणेश पांचाळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या कैद्यांची नावं आहेत. या कैद्यांवर उपचार सुरु आहे. प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगळं यांच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली.
या हाणामारी प्रकरणी कारागृह शिपाई यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एकनाथ गांधले असं या शिपायाचं नाव आहे. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे,साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, ओंकार नारायण गाडेकर, मंगेश शकील सय्यद यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक 2च्या जवळील हौदाजवळ 31 मार्च रोजी घडला. सकाळी पावणेदहा वाजता ही हाणामारी करण्यात आली आहे.
मागील वर्षी आळंदीत दोन गटात भांडणं झाली होती. या भांडणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर आणि इतरांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना येरवडा येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. या विभागात बाकी कैदीदेखील आहेत. हरीराम पांचाळ आणि मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपीची भांडणं झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन अर्जुन वाघमोडे आणि इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार शिपायांना कळताच त्यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावं होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)