पुणे हादरलं! एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Pune Crime News : पुण्याहून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या आहेत. लग्नाचे आमिष, सोशल मीडियावरील ओळख, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देत या 5 बलात्काराचा घटना घडल्या आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, लोणिकंद पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. एकाच दिवशी पाच बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी आरोपींचा तपासही करत आहे.
1) मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत कोल्हापूरच्या एका 34 वर्षीय महिलेवर लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
2) दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
3) तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
4) चौथ्या घटनेत अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिच्याशी मैत्री करुन तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
5) पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
जळगावमध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या
कालच जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना मोर आली होती. ही घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना चिंचखेड गाव शिवारात घडल्याचं समोर आलं. चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले असताना, घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सातत्यानं बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. या घटना घडत असल्यामुळं नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अशा घटानांप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: