एक्स्प्लोर

Ayush Komkar : गँगवॉरचा बदला घेण्यासाठी भाचा आयुष कोमकरला संपवलं; मामा वनराज आंदेकरच्या हत्येमागची स्टोरी काय?

Ayush Komkar Muder Case : राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून 20 वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. यातून आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

पुणे : शहरातल्या नाना पेठ परिसरात गणपती विसर्जन सोहळ्याच्या आदल्या दिवशी गोळीबार (Firing in Pune) झाला आणि पुन्हा एकदा टोळी युद्धाला (Gangwar in Pune) तोंड फुटलं. गणेश कोमकरचा (Ganesh Komkar) 19 वर्षीय मुलगा आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याची गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपींनी दुचाकीवरून येत तीन गोळ्या झाडल्या आणि आयुषच्या त्यामध्ये जीव गेला.

पुण्यात बंडू आंदेकर टोळीची दहशत मोठी आहे. 90 च्या दशकापासून ही टोळी कार्यरत आहे. बंडू आंदेकरला प्रमोद माळवदकर हत्या प्रकरणी जन्मठेप झाली होती. त्यानंतर तो शिक्षा भोगून बाहेर आला होता. बंडू आंदेकरची मुलगी संजीवनी ही जयंत कोमकरची पत्नी आणि आता हत्या झालेल्या आयुष कोमकरची काकी. वनराज आंदेकर तिचा सख्खा भाऊ.

Vanraj Andekar Murder Case : वनराज आंदेकरचा खून कसा झाला?

मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder Case) याची थरारक हत्या करण्यात आली होती. आंदेकर कुटुंब आणि कोमकर कुटुंबामध्ये एकेकाळी घट्ट संबंध होते. पण संपत्तीच्या वादातून (Property Dispute) मतभेद वाढले आणि ते पुढे रक्तरंजित संघर्षात बदलले.

वनराज आंदेकरचा काका आणि माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं. मात्र, मनपाने ते दुकान अतिक्रमण कारवाईत पाडलं. यामागे त्यावेळी नगरसेवक असलेला वनराज आंदेकर असल्याचा राग कोमकर कुटुंबाला होता.

Andekar Komkar Gang War : गायकवाड-आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध

या घटनेमागे केवळ कौटुंबिक वादच नव्हता, तर बंडू आंदेकर गट (Bandu Andekar Gang) आणि सोमनाथ गायकवाड टोळी (Somanath Gaikwad Gang) यांचं वैरही कारणीभूत होतं. 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहिभाते आणि निखील आखाडेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात निखीलची हत्या झाली. त्यानंतर गायकवाड टोळी बदला घेण्याच्या संधीच्या शोधात होती. त्याच काळात कोमकर गटाने गायकवाड टोळीचा वापर करून वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा आहे.

Andekar Family History : आंदेकर घराण्याची पार्श्वभूमी

आंदेकर कुटुंबाचा राजकारणात मोठा दबदबा आहे. वनराज आंदेकर 2017 मध्ये पुणे महापालिकेचे नगरसेवक (Pune Corporator) म्हणून निवडून आला होता आणि 2022 पर्यंत पदावर होता. त्याआधी त्यांची आई राजश्री आंदेकर यांनी सलग दोन टर्म नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं. चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. याशिवाय 90 च्या दशकात आंदेकर गँगने माळवदकर गटाविरुद्ध मोठं टोळीयुद्ध केलं होतं, ज्यात प्रमोद माळवदकरची हत्या झाली. त्या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकरचा खून 

गणेश कोमकरवर वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोप आहे. त्यांचा बदला (Revenge Killing) म्हणून गणेशचा मुलगा आयुष कोमकर याला लक्ष्य बनवून मारण्यात आलं. यामुळे आंदेकर-कोमकर संघर्ष (Andekar-Komkar Rivalry) आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी सुरू केली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Pune Paraded Case : अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
अल्पवयीन आरोपींची गाडीच्या बोनेटला बांधून भररस्त्यात धिंड; पोलीस निरीक्षकाची अखेर तडकाफडकी बदली
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
Embed widget