एक्स्प्लोर

Ayush Komkar : मामाच्या हत्येचा बदला, डीजेवर 'टपका रे टपका' गाणे वाजवत भाच्याला गोळ्या घातल्या; पुण्यातील टोळीयुद्धात संपलेला आयुष कोमकर कोण?

Vanraj Andekar Case : गेल्या वर्षीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने समोर असलेल्या भाच्यालाही सोडलं नाही. आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

पुणे : एका वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची हत्या झाली, त्याच ठिकाणी बदला म्हणून 20 वर्षांच्या भाच्याला गोळ्या घालून संपवलं. पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धामध्ये गोविंद उर्फ आयुष कोमकर या 20 वर्षांच्या युवकाची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा कुख्यात गुंड गणेश कोमकरचा मुलगा आहे. तर गणेश कोमकर हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे.

मंगळवारी रात्री नाना पेठ परिसरात हत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली . गणेश कोमकर या 20 वर्षांच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासमधून येत असताना घराच्या बेसमेंटजवळ ही हिंसक घटना घडली. ही हत्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. गणेश कोमकर आणि संजीवनी कोमकर हे दोघेही वनराज आंदेकर हत्या प्रकरणी (Vanraj Andekar Murder Case) मुख्य आरोपी आहेत.

Who Was Ayush Komkar : आयुष कोमकर कोण होता?

आंदेकर कुटुंबातील प्रमुख बंडू आंदेकर याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी होती. त्याला वनराज आणि संजिवनी अशी दोन अपत्यं. संजिवनी हिचं लग्न जयंत कोमकर याच्याशी झालं. जयंत कोमकर हा गणेश कोमकरचा सख्खा भाऊ. याच गणेश कोमकरचा मुलगा म्हणजे आयुष कोमकर. आयुष कोमकर हा 20 वर्षांचा असून महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

एका जमिनीच्या वादातून आंदेकर आणि कोमकर या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर 1 सप्टेंबर 2024 रोजी, संजिवनी कोमकरने तिचा सख्खा भाऊ असलेल्या वनराज आंदेकरची हत्या केली. या प्रकरणा आयुष कोमकरचा बाप असलेल्या गणेश कोमकरलाही अटक करण्यात आली.

टोळी-युद्धाची पार्श्वभूमी

वनराज आंदेकर हत्या: 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली. आयुष कोमकरचा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.

भाच्याची हत्या करून बदला घेतला

गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये 'टपका रे टपका, एक ओर टपका' हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे. मात्र या दोन्ही टोळ्यांतील वाद शमेल असं वाटत नाही.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Sunetra Pawar on Finance Ministry: अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
अर्थ खातं कोणाकडे? प्रश्नावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उत्तराने भुवया उंचावल्या; म्हणाल्या...
Pune News: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या कार्यक्रमात गोंधळ; शाहिद कपूरला पुण्यात धक्काबुक्की; नियोजनाचा कलाकारांना फटका
Rain Updates: पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?
पावसाची तूट भरून निघणार, भारतात चांगला मान्सून कोसळणार; जपान आणि अमेरिकी संस्थेचा दिलासादायक अंदाज, नेमकं काय म्हटलंय?

व्हिडीओ

America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Embed widget