आधी पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला, मग स्वतः पोलिसांत गेला; परभणीतील घटनेने खळबळ
Parbhani Crime News : पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
![आधी पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला, मग स्वतः पोलिसांत गेला; परभणीतील घटनेने खळबळ Parbhani Crime News Husband attack wife with sharp weapon in Parbhani Wife seriously injured marathi news आधी पत्नीवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला, मग स्वतः पोलिसांत गेला; परभणीतील घटनेने खळबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/18/e3201f172fe8c7c9fa13054a8099fdba1705549788638737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parbhani Crime News : परभणी (Parbhani)जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पतीनेच आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील बोरी ग्रामीण रुग्णालयाजवळील ही घटना असून, हल्ला करणारा व्यक्ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मात्र, हल्ला करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे. तर, पतीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रोहित गायकवाड असे हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या बोरीत आज सकाळी एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी अनेक वार करून तीला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे. तर, हल्ला करणाऱ्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.
अचानक पत्नीच्या माहेरी पोहचला अन् हल्ला केला...
हल्ला करणारा रोहित हा धाराशिव जिल्ह्यातील भूम इथंला रहिवासी आहे. रोहित आणि जखमी मुलीचा 2021 ला विवाह झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून मुलगी आपल्या माहेरी राहत होती. आज अचानक रोहित गायकवाड मुलीच्या माहेरी म्हणजेच बोरी गावात पोहचला. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे येऊन सदर मुलीवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने एकामागून एक वर करत त्याने आपल्या पत्नीला गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे.
पोलीस शोधतायत हल्ल्यामागचे कारण
मात्र नेमकं या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असुन, पोलीस पुढील तपास करत आहेत. रोहित गायकवाड यांची पत्नी अत्यंत गंभीर असून, तिला उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, पोलिस रोहितची चौकशी करून या हल्ल्यामागचे कारण शोधत आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)