एक्स्प्लोर

तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार, पंढरपुरातील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीवर तलवारीचा धाक दाखवून सात दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

पंढरपूर : एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत विविध ठिकाणी तिच्यावर सात दिवस तलवारीचा धाक दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला जेरबंद केलं आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांकडून मात्र पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं उभं करण्यास सुरुवात झाली आहे. 

पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीस त्याच परिसरात राहणाऱ्या विकास माउली जाधव याने फूस लावून पळवून नेलं होतं. या तरुणास तक्रार दाखल झाल्या दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी अटक  करून त्याच्यावर अपहरण, बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे.  या आरोपीस न्यायालयासमोर उभं केलं होतं. पुढच्या तपासासाठी न्यायालयाने आरोपीला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचंही कदम यांनी सांगितले आहे. 

Kalyan : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; सात वर्षानंतर वाचा फुटली, आरोपीवर गुन्हा दाखल
  
या प्रकरणात कुटुंबाचा दाखल देत आता काही सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. बहुजन समाजातील या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने तिला महाराष्ट्र शासन लिहिलेल्या गाडीतून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याला मदत करणाऱ्या सर्वांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील हस्तक्षेप करीत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Pune Crime : शॉर्टफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल

या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने हातात तालावर घेतलेला फोटो मुलीच्या नातेवाईकांना पाठवले होते. या कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण द्यावे , ही केस जलदगती न्यायालयात चालवावी आणि या मुलींसाठी राज्यातील चांगल्यात चांगला वकील देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते माऊली हळणवर आणि सुभाष म्हस्के यांनी केली आहे. पोलिसांनी मात्र या प्रकारात सरकारी गाडी वापरल्याचा आरोप धुडकावून लावीत आत्तापर्यंत तपासात असे पुढे आले नसल्याचे सांगितले आहे. 
दरम्यान, या प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी पोलीस करीत असून यात दोषी आढळणाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल केला जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा पंढरपुरात गुंडगिरीच्या दहशतीवर होत असलेले गैरप्रकार समोर आले आहेत. या घटनेबाबत गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या सामाजिक संघटनांनी केली आहे. 

शाळेच्या समोर झालेल्या मारामारीत विद्यार्थ्याने केला मित्राचा खून

महत्त्वाच्या बातम्या

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
Embed widget