एक्स्प्लोर

NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात

NEET Exam Paper Leak: शुभम खैरनारच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर आले असून, यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

NEET Exam Paper Leak: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट' (NEET UG) पेपरफुटी प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनार (Shubham Khairnar) याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. शुभमच्या थेट संपर्कात असलेले नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर आले असून, यात काही प्रतिष्ठित क्लासचालकांचीही चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे एक विशेष पथक सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणातील बारकावे तपासत आहे. नीट पेपरफुटी प्रक्रियेत 'टेलिग्राम' (Telegram) या सोशल मीडिया माध्यमाचा सर्वाधिक वापर करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे सीबीआय आता पुढील तपास करत आहे. तसेच, शुभम खैरनार राहत असलेल्या आणि त्याच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि कॉल डिटेल्स (CDR) सीबीआयकडून खंगाळले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत शुभमच्या संपर्कात कोण-कोण आले? त्याने कोणाशी दूरध्वनीवरून किंवा सोशल मीडियावरून संशयास्पद संवाद साधला? याचा सखोल मागोवा घेतला जात आहे.

NEET Exam Paper Leak: मित्रांचे जाबजबाब सुरू; वैद्यकीय प्रवेशाचे रॅकेट उघडकीस?

शुभम खैरनारच्या अटकेनंतर त्याच्या जवळच्या मित्रांची आणि इतर संबंधितांची कसून चौकशी केली जात असून त्यांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक चौकशीत शुभमने यापूर्वी काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात (Medical Admissions) प्रवेश मिळवून दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे नाशिकमधील काही नामांकित कोचिंग क्लासेसचे संचालक देखील आता सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या चौकशीतून आणखी काही मोठे पुरावे आणि नाशिकमधील इतर संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NEET Exam Paper Leak: मास्टरमाईंड ताब्यात

नाशिकव्यतिरिक्त नीट पेपरफुटीचे कनेक्शन लातूरमध्ये पोहोचले आहे. एनटीएच्या (NTA) परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेला रसायनशास्त्राचा माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेतले आहे. कुलकर्णी याला थेट प्रश्नपत्रिकांपर्यंत प्रवेश (Access) होता आणि त्यानेच एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आपल्या नेटवर्कद्वारे प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप आहे. पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्या संपर्कातही कुलकर्णी असल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET Exam Paper Leak: 21 जून रोजी होणार 'नीट'ची पुनर्परीक्षा

दरम्यान, 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या घोटाळ्यामुळे रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आता या परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले असून, 21 जून 2026 रोजी नीटची पुनर्परीक्षा (Re-Exam) घेतली जाणार आहे. या पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून विद्यार्थ्यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. आता सीबीआयच्या चौकशीत आणखी काय महत्त्वाची माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

NEET Exam Paper Leak:  मनीषा मांढरेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार

NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक झाल्यानंतर मॉडर्न कॉलेज प्रशासनाने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 वर्षांपासून त्या महाविद्यालयात कार्यरत असून 2002 पासून अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होत्या. महाविद्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, खाजगी शाळेतील कर्मचारी नियमावली 1881 मधील तरतुदीनुसार चौकशी प्रक्रिया राबवली जाणार असून शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा

NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget