एक्स्प्लोर

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन तासांच्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक जखमी 

Chhattisgarh Naxal :  महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास  गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.

Chhattisgarh Naxal गडचिरोलीमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास  गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना यश आले आहे. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर ठार झालेल्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला माओवाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलामध्ये ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर तीन तास चाललेल्या या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सध्या पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टर ने गडचिरोलीला रवाना करण्यात आले आहे. सुमारे तीन तास चाललेल्या या चकमक आजूनही काही माओवादी मारल्या गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या परिसरात पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन सुरू केले असून कसून तपास सध्या सुरू आहे.  

चकमकीत पोलीस उपनिरीक्षक जखमी, हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट

या प्रकरणी हाती आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे 3 तास चकमक सुरू होती. यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टर ने एअरलिफ्ट करून गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जवनांच्या मदतीसाठी बॅकअप फोर्सही पाठवण्यात आला आहे. जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या C-60 दलात आहेत. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागल्याची माहिती आहे. कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे.

ही चकमक छत्तिसगडच्या कांकेर जिल्ह्यातील पांखाजूर आणि गडचिरोलीच्या जंगलात झाल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीसचे C-60 चे जवान गडचिरोली येथून नक्षल विरोधी अभियानासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान झारवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सध्या परिसरात शोध सुरू आहे. सैनिक परतल्यानंतरच अधिक माहिती मिळेल.

14 जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकूण 14 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केलं आहे की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget