Navi Mumbai Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् किरकोळ वाद विकोपाला; संतापात पतीने पत्नीला निर्घृणपणे संपवलं; नवी मुंबईतील करावे गाव हादरलं!
Navi Mumbai News :नवी मुंबईतील करावे गावातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात करावे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे.

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील करावे गावातुन (Karave Village) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात करावे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कौटुंबिक वाद आणि वाद विकोपाला (Navi Mumbai Crime) गेल्यानंतर पतीने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून पुढील कारवाई सध्या सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात (Navi Mumbai News) एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करावे गावात ज्योती काकडे आणि राजू काकडे आपल्या दोन मुलांच्या समवेत राहत होते. राजू हा व्यसनी असून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. मात्र गेल्या काही महिन्यापासून तो बहुतांश वेळेस मूळ गाव असणाऱ्या बुलढाणा येथे राहत होता. पंधरा दिवसापूर्वी तो नवी मुंबईत आला होता. तेव्हापासून पती-पत्नीचे वाद सुरु होते. वाद जास्तच झाल्यावर राजूने स्वयंपाक घरातील सुरी घेवून रागाच्या भरात पत्नी ज्योतीच्या पायावर, पोटावर, छातीवर सपासप वार केले. हि घटना घडल्यानंतर उशिरा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता या हल्ल्यात अति रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच केला लैंगिक अत्याचार (Akola Crime News)
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केलाय. या पाच वर्षीय चिमुकलीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर असून खदान पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केली आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर नराधम बापाला काही तासातच खदान पोलीसांकडून अटक करण्यात आली. आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली होती, याचीचं संधी साधून सावत्र बापाने आपल्या पाच वर्षाची चिमुकली मुलीवर अत्याचार केला आहे. मुलीचे पोट जास्त दुखू लागल्याने तिने आई घरी परतल्यानंतर सर्व प्रकार सांगितला. लागलीच रुग्णालयात दाखल केला असता संपूर्ण प्रकार समोर आलाय.
महत्वाच्या बातम्या:
























