एक्स्प्लोर

Ashok Kharat: तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...

Ashok Kharat: आपल्या मागे राजकीय शक्ती असल्याचा आत्मविश्वास खरातला होता. तुम्ही पाप करत आहात, असेही तो पोलिसांना सांगत होता. मात्र आता आपला पाय खोलात गेल्याची जाणीव खरातला कोठडीत होऊ लागली आहे.

नाशिक : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok kharat) याच्या अटकेनंतर दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत, पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर चवताळलेल्या खरातने (Ashok kharat) चक्क पोलिसांनाच शाप देण्यापर्यंत मजल मारली होती. 'तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल', अशी भीती तो पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आता त्याचा सगळा आव गळून पडला असल्याचं  दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय शक्ती आपल्या पाठीमागे आहेत या जोरावर एसआयटी अधिकाऱ्यांशी आत्मविश्वासाने हुज्जत घालणारा खरात (Ashok kharat) आता मात्र नरम झाला आहे. चौकशीचा फास आवळला गेल्याने आणि सर्व बाजूने कोंडी झाल्याने खरातचा थयथयाट थांबला असून, दोन-तीन वेळा तो कोठडीत रडल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok kharat) 

अशोक खरातला (Ashok kharat) अटक केल्यानंतर पहिल्या आठवड्यात तो प्रंचड आत्मविश्वासाने पोलिसांशी आणि एसआटीच्या अधिकाऱ्यांशी बोलत होता. त्यावेळी आपल्या मागे राजकीय शक्ती असल्याचा आत्मविश्वास खरातला होता. तुम्ही पाप करत आहात, असेही तो पोलिसांना सांगत होता. मात्र आता आपला पाय खोलात गेल्याची जाणीव खरातला कोठडीत होऊ लागली आहे. त्यामुळे दोन, तीन वेळेस तो चक्क कोठडीत रडल्याचेही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.(Ashok kharat) 

Ashok Kharat:  आज न्यायालयात हजर करणार

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने भोंदू अशोक खरातला आज (बुधवारी दि. ८) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. एकूण १२ गुन्ह्यांपैकी दोन नंबरच्या गुन्ह्यात खरातला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पीडितेवर अत्याचार करून तीला गर्भवती केले नंतर तीचा गर्भपात केला, अशा स्वरूपाचा गुन्हा खरातवर आहे. आजची सुनावणी देखील सुरक्षेच्या कारणाने ऑनलाइन (व्हीसीद्वारे) व्हावी, अशी विनंती एसआयटीने केली आहे.

Ashok Kharat:  आणखी ११ पीडित महिलांनी केली तक्रार

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाचे भीती दाखवत असे. "तुझ्या पतीचा किंवा मुलाचा मृत्यू होईल," अशी भीती घालून तो महिलांचे मानसिक खच्चीकरण करायचा. त्यानंतर 'ऊर्जा, विशेष पूजा आणि शरीरशांती' मिळवून देण्याच्या बहाण्याने तो या महिलांचे शारीरिक शोषण करत असे. अनेक महिलांनी आपली हक्काची मालमत्ता आणि जमीनही खरातने दहशतीखाली बळकावल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. आणखी ११ पीडित महिलांनी पुढे येत खरातवर (Ashok Kharat) लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता प्रचंड वाढली आहे. या सर्व तक्रारींची चौकशी शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे.

Ashok Kharat: खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे दाखल

नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तैनात केले आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा हे पथक करत असून, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत भोंदू अशोक खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे असून त्यांचा सखोल तपास सुरू आहे.

आणखी वाचा - Ashok Kharat: आधी 12 गुन्हे; आता आणखी 11 तक्रारी, घरात मृत्यू होईल अशी भीती घालायचा अन् 'ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती'च्या नावाखाली अशोक खरात नको ते करायचा

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget