एक्स्प्लोर

Nashik Crime : पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की पोलीसही चक्रावले

Nashik Crime News : माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्यामुळे नाशिकच्या एका तरुणाने नैराश्यातून थेट पोलीस ठाणे गाठत मोठं पाऊल उचलल्याने पोलीसही चक्रावले.

Nashik Crime News नाशिक : माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्यामुळे नाशिकच्या एका तरुणाने नैराश्यातून थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अंमलदार कक्षात बसूनच त्यांने विषारी औषधाचे सेवन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) हा प्रकार घडला असून यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या तरुणाला अंबड पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे निलेश साळवे (22, रा. मोरवाडी, सिडको) हा मजुरी काम करत असून, काही महिन्यांपूर्वी निलेशचा विवाह झाला होता. मात्र तो कामधंदा करत नसल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघुन गेली होती. 

अंमलदार कक्षात बसूनच विषारी औषधाचे सेवन 

पत्नी घरी नसल्याने निलेश हा तणावातून दारु प्यालेला होता. तो दारुच्या नशेतच अंबड पोलीस ठाण्यात गेला. निलेश साळवे याने अंमलदार कक्षात बसूनच कीटकनाशक औषध सेवन केल्याने पोलिसांची चांगली तारांबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी तात्काळ निलेशला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

ध्रुवनगरला चार लाखांची घरफोडी

घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाट उघडत सोन्याचांदीचे दागिने असा 3 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना ध्रुवनगर येथे घडली. फिर्यादी कैलास बाबूराव कटारे हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व लॉक कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडून त्यातील 3 लाख 72 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू 

सहाव्या मजल्यावरून खाली पडलेल्या बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना चेहेडी पंपिंगजवळ घडली. श्री साई डेव्हलपर्स यांची चेहेडी पंपिंग स्टेशनजवळ बांधकाम साईट सुरू आहे. या ठिकाणी साईटवर काम चालू असताना श्रीकांत नवनाथ टिक्कल हे मजूर सहाव्या मजल्यावरून जमिनीवर पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

इतर महत्वाच्या बातम्या

Wardha News : गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं; आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न

हाय प्रोफाईल डॉक्टर फरार, पोलिस तपास संशयात?; मृत ऋचासाठी सोशल मीडियातून आवाज, खा. प्रणिती शिंदेंची भेट घेणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्सWalmik Karad Mother : वाल्मीक कराडच्या आईची तब्येत बिघडली,रुग्णालयात दाखल करायला सांगितलंWalmik Karad Mcoca : वाल्मीक कराडवर मकोका! पुढे काय कारवाई होणार? CID ला कोणते पुरावे मिळाले?Suresh Dhas On Walmik Karad Mcoca : कायदा कोणालाही सोडणार नाही, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Nashik : हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
हृदयद्रावक! 4 महिन्यांवर लग्न, गुजरातहुन बहिणीला भेटण्यासाठी बाईकवर निघाला, वाटेतच नायलॉने मांजाने घात केला
 EPFO News: ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, केवायसीची प्रक्रिया सोपी होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
ईपीएफओ नवी सेवा लाँच करणार, KYC एका क्लिकवर होणार, लवकरच पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार
Embed widget