नाशिक हादरलं! वैयक्तिक वाद टोकाला, सख्ख्या लहान भावाला भोसकून संपवलं, दोन्ही भाऊ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
Nashik Murder Case: घरगुती वादातून हत्याराने वार करत सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना नाशिकच्या सातपूर भागात घडलीये

Nashik Crime: नाशिकच्या सातपूर परिसरात मोठ्या भावानेच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वाद इतका टोकाला गेला की मोठ्या भावाने धारदार हत्याराने हल्ला करत लहान भावाचा जीव घेतला. करण तुकाराम शिंगाडे (वय 30 ) असं मृताचं नाव असून, आरोपी मोठा भाऊ अर्जुन शिंगाडे याला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. (Nashik Crime)
दोघा भावांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, अर्जुनने संतापाच्या भरात करणच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार चाकूने हल्ला केला....आणि यात तो मरण पावला. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे.
नेमकं घडलं काय?
घरगुती वादातून हत्याराने वार करत सख्ख्या लहान भावाचा खून केल्याची घटना नाशिकच्या सातपूर भागात घडलीये... करण तुकाराम शिंगाडे असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी अर्जुन शिंगाडे याला सातपूर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. घटनेतील मृत व त्याचा भाऊ यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. करणला पोलिसांनी यापूर्वी तडीपारदेखील केले होते. सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरात ही घटना घडलीये.
संतापाच्या भरात सख्या भावाला संपवलं
संतोषीमाता नगर भागात करण व अर्जुन शिंगाडे हे दोघे सख्खे भाऊ राहत होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी त्यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद झाला. वाद एवढा टोकाला गेला की मोठ्या भावाने संतापाच्या भरात घरात असलेल्या धारदार चाकूने करणवर हल्ला केला. छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार झाल्याने करणचा जागीच मृत्यू झाला. मृत करण शिंगाडे आणि आरोपी अर्जुन शिंगाडे यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. करण याला यापूर्वी पोलिसांनी तडीपार देखील केलं होतं. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने ते दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. या घटनेनंतर सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी अर्जुनला ताब्यात घेतलं. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत.
भावानेच भावाचा खून केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतोषीमाता नगर आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून अर्जुनची चौकशी सुरू आहे. वाद नेमका कशामुळे झाला याचा तपासही सुरू आहे.
हेही वाचा























