एक्स्प्लोर

धक्कादायक! 10 रुपयांच्या वर्गणीवरून हुज्जत घातली, नाशकात टोळक्यानं कोयत्यानं अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला केला

Nashik Crime :रक्ताच्या  थारोळ्यात पडलेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले .

Nashik Crime : अवघ्या 10 रुपयांच्या वर्गणीवरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रुपांतर गंभीर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना भद्रकाली परिसरातील नानावली गोठ्याजवळ घडली. या हल्ल्यात 16 वर्षीय रजा फिरोज शेख या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्र येत कोयत्याने थेट गळ्यावर वार केला. रक्ताच्या  थारोळ्यात पडलेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले . त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे . रुणालयात मुलाच्या नातेवाईकांचा प्रचंड संताप अनावर झाला आहे .

काही दिवसांपासून नाशकात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र असून किरकोळ वादातून होणाऱ्या या हाणामाऱ्या गंभीर स्वरूपाच्या होत आहेत .

नेमकं घडलं काय?

ही घटना सोमवारी (30 जून) रात्रीच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, परिसरातील काही युवकांमध्ये वर्गणीच्या रकमेवरून वाद झाला होता. रकमेची मागणी, तिच्यावरून झालेली हुज्जत आणि त्यातून निर्माण झालेला राग इतका वाढला की टोळक्याने थेट हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्र वापरत रजावर गळ्याजवळ वार केला. हल्ला इतका जबरदस्त होता की रजा रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला तत्काळ नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची स्थिती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे.

भद्रकाली पोलीस अलर्ट मोडवर

घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत हल्लेखोरांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत झालं आहे. किरकोळ कारणावरून अशा हिंसक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cartoon War: 'डोरेमान म्हणणाऱ्या Ravindra Dhangekar यांना डॉबरमॅन म्हणू शकतो', Navnath Ban यांचा पलटवार
Maharashtra Politics: 'तुझं पोट फाडून बाहेर नाही आलो तर नावाचा नाही', Uddhav Thackeray यांचा Anaconda टीकेवरून हल्लाबोल
Audio Clip Politics : Sushma Andhare पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप, निंबाळकर टार्गेटवर
Politics Cartoon War हा Doremon कोण?'शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांचा सवाल; नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis : 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे Pappu बनू नये', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
Embed widget