एक्स्प्लोर

Pune Crime Rave Party: मोठी बातमी: पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासोबत बडा क्रिकेट बुकी सापडला

Pune Crime Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्यामागे राजकीय कटकारस्थान असल्याचा दावा केला जात आहे

Pune crime news: पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर हेदेखील आढळून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर सध्या पुण्यात वेगवान घडामोडी सुरु आहेत. पुणे पोलिसांकडून याप्रकरणात वेगाने कारवाई सुरु आहे. छाप्यावेळी पोलिसांना रेव्ह पार्टी सुरु असलेल्या फ्लॅटमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला आढळल्या होत्या. या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आज सुट्टीच्या न्यायालयात हजर केले जाईल.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. प्रांजल खेवलकर आणि त्यांचे मित्र आधी पुण्यातील पबमध्ये गेले होते. मात्र, पब बंद असल्याने त्यांनी बीएनबी या अॅपवरुन खराडीतील दोन फ्लॅट हाऊस पार्टीसाठी बुक केला होता. खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसमध्ये हे फ्लॅट बुक करण्यात आले होते. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने हे बुकिंग करण्यात आले होते. हॉटेल बुकिंगच्या पावत्या समोर  आल्या आहेत. 25 ते 28 जुलैपर्यंत हे बुकिंग करण्यात आले होते. रूम नंबर १०१ आणि रूम नंबर १०२ खेवलकर यांच्या नावाने फ्लॅट बुक करण्यात आले होते. एका फ्लॅटचे भाडे 10 हजार 357 रुपये इतके होते. यापैकी एका रुमचे बुकिंग 25 ते 28 तारखेपर्यंत होते तर दुसऱ्या रुमचे बुकिंग 26 जुलै ते 27 जुलै या तारखेसाठी करण्यात आले होते.

Pune Crime: पुण्यातील रेव्ह पार्टीत क्रिकेट बुकी

पुण्यातील या रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासोबत एक क्रिकेट बुकीही सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री तीन वाजता ही रेव्ह पार्टी सुरु झाली. या पार्टीत दारु, हुक्का यासोबत अल्प प्रमाणात गांजा आणि कोकेन सापडल्याची माहिती आहे. पोलिसांनी सध्या अटक केलेल्या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले असून थोड्याचवेळात त्यांना कोर्टात हजर केले जाईल. त्यावेळी पोलिसांकडून प्रांजल खेवलकर यांच्याबाबत काय माहिती दिली जाईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आणखी वाचा

आधी रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडलं, नंतर प्रांजल खेवलकरांच्या हडपसरच्या बंगल्यावर छापा टाकला, पुणे पोलिसांच्या वेगवान हालचाली

पोलिसांना ऑनलाईन हाऊस पार्टीची टीप मिळाली, पुण्यातील फ्लॅटवर धाड टाकताच समोर काय दिसलं?

मोठी बातमी: एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोर्चा आता पुण्याकडे, स्वारगेट परिसरात टाकली अचानक धाड
अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोर्चा आता पुण्याकडे, स्वारगेट परिसरात टाकली अचानक धाड
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
पुण्यात शिकलेले धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी, देशसेवेत मोठी जबाबदारी
धक्कादायक! लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन पिंपरीत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
धक्कादायक! लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन पिंपरीत पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
मन हेलावणारी घटना, घरातून सांगून निघाले, दूधसागर नदीपात्रात बुडून चार जणांचा मृत्यू; तीन सख्ख्या भावांचा समावेश
Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक
Embed widget