एक्स्प्लोर

Nashik Crime News : जिल्ह्याभरातून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; 16 दुचाकी हस्तगत

Nandgaon News : जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 16 दुचाकी हस्तगत करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 16 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Nashik Nandgaon News नांदगाव : अलिकडच्या काळात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर दुचाकींची चोरी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून चोरीला गेलेल्या तब्बल 16 दुचाकी हस्तगत करण्यात नांदगाव पोलिसांना यश आले आहे. दुचाकी चोरणाऱ्या तिघा संशयितांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकार उपस्थित होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर शांतीलाल कायस्थ यांची हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स दुचाकी (एम.एच.41 बी.के.1088) ही चोरी गेली होती. कायस्थ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच इतरही दोन दुचाकी चोरल्याच्या घटना नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या होत्या. 

तपासाची चक्रे फिरवली

त्यानंतर तत्कालीन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पथकाची नेमणूक करून वेगाने तपास करून गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांनी तपासाची चक्रे फिरवली.

तिघांना घेतले ताब्यात

पोलिसांनी संशयित अंकुश दादासाहेब गायकवाड (रा.नांदुर ता.नांदगांव ) यास ताब्यात घेतले. त्याचा दुसरा साथीदार पवन शंकर आहिरे (रा. निंबायती ता. मालेगांव) यास शिरपुर (जि.धुळे) येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले तर तिसरा संशयित आरोपी हर्षल मनोहर गवारे यास शिवकृपानगर, राजविलास सोसायटी, बोरगड म्हसरुळ येथून ताब्यात घेतले.

16 दुचाकी चोरल्याची दिली कबुली

या तिघांची सखोल चौकशी केली असता या तिघांच्या टोळीने नांदगांव पोलीस ठाणे हद्दीत चार, येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन, येवला तालुका,  मनमाड, लासलगांव, मालेगांव व छावणी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक, पोलीस आयुक्तालय नाशिक शहर घटकातील पोलीस ठाणे हद्दीत सहा अशा एकूण 16 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. या टोळीकडून १6 दुचाकी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हस्तगत केल्या आहेत. 

'या' पथकाने केली कारवाई

अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर,  मनोज वाघमारे, पोलीस हवालदार विनायक जगताप, धर्मराज अलगट, भारत कांदळकर, मुदस्सर शेख,अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, दत्तू सोनवणे, दिपक मुंडे, सागर बोरसे, साईनाथ आहेर, परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दुचाकी मिळाल्याने पेढे वाटून साजरा केला आनंद

मनमाड पोलीस ठाणे हद्दीतील ललित बडगुजर यांची दुचाकी 31 डिसेंबरला चंद्रभागा लॉन्स येथून चोरी गेलेली होती.  एक महिना तपास करूनही गाडी मिळत नसल्याने बडगुजर कुटुंब व्यथित होते. ही गाडी ललित यांच्या आजीने घेवून दिल्याने त्या दुचाकीसोबत त्यांच्या भावना जडलेल्या होत्या. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी ललित बडगुजर यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून तुमची दुचाकी सापडली असल्याचे कळविले. बडगुजर यांना दुचाकी सापडल्याचा एवढा आनंद झाला की, त्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात पेढे वाटत आनंद साजरा केला. आमच्या भावना त्या दुचाकीशी जोडल्या गेलेल्या होत्या. नव्याने दुसरी दुचाकी घेणे आमच्या परिस्थितीनुसार अशक्य होते असे सांगताना ललित यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले होते.

आणखी वाचा 

Nashik : मालेगावमध्ये वर्षभरात तब्बल 319 कोटींची वीजचोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget