(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded Murder : मुलानेच दोन लाखांची सुपारी देऊन त्याच्या वडिलांची हत्या घडवल्याचं पोलिस तपासात उघड झालं असून पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.
नांदेड : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले असून मुलानेच त्याच्या वडिलाच्या हत्येसाठी सुपारी दिली असल्याचं समोर आलं आहे. घरघुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. मुख्य आरोपी मुलासह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर सुपारी घेणारा आरोपी फरार आहे.
नांदेडमध्ये 1 सप्टेंबर रोजी हॉटेल व्यासायिक शेख युनूस शेख पाशा यांची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सहा दिवसात 3 आरोपींना ताब्यात घेतले. यात आरोपी मुलाचा देखील समावेश आहे. तर इतर दोन जणांनादेखील ताब्यात घेतले आहे.
छोट्या छोट्या वादातून हत्या
दोन लाख रुपयांची सुपारी देऊन वडिलांचा काटा काढण्याचे षडयंत्र रचले. वडील आणि मुलामध्ये रोज छोट्या छोट्या गोष्टी वरून वाद होत होते. मुले वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाद वाढत गेल्याने आरोपी मुलगा शेख अजमद शेख इसाक याने वडिलांची हत्या घडवून आणली. पोलिसांनी आरोपी शेख अजमद शेख इशाक याच्यासह इतर दोघांना ताब्यात घेतले आहे. सुपारी घेणारा आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं?
खडकपुरा येथील रहिवासी शेख युनूस शेख पाशा यांचं मदिना हॉटेल आहे. 31 ऑगस्टच्या रात्री आपल्या कुटुंबीयासोबत झोपले होते. 1 सप्टेंबर रोजी सकाळी रक्तबंबाळ त्यांचा अवस्थेत मृतदेह आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्री फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आले. यावेळी दोन जण घरात प्रवेश करताना दिसून आले. पोलिसांकडून कुटुंबीयांतील सदस्यांचा जवाब घेण्यात आला. यावेळी मयताचा मुलगा शेख यासेर अरफात याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुपारी देऊन वडिलांचा खून केल्याची कबुली दिली.
वडिलाच्या हत्येसाठी आरोपी शेख यासेर अरफात याने आपल्या मित्राला दोन लाख रुपयाची सुपारी दिली होती. घटनेच्या रात्री मुलाने मुख्य गेट आणि बेडरूमचा दरवाजा खुला ठेवला होता. सकाळी तीन ते चार वाजेच्या दरम्यान दोघांनी घरात शिरून हॉटेल व्यवसायिकाचा खून केला आणि आल्या त्या मार्गाने पळून गेले. सकाळी मुलानेच पोलिसांना फोन करून आपल्या वडिलांची कोणीतरी खून केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी मनमान येथील शेख अमजद शेख इसाक आणि योगेश शिवाजी निकम यांना ताब्यात घेतले आहे. सुपारी घेणार आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मयत शेख युनूस शेख पाशा यांचा आपल्या पत्नी सोबत छोट्या छोट्या कारणावरून नेहमी वाद व्हायचे. मुलांकडून समजवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. मात्र वाद वाढत गेल्याने मुलाने षडयंत्र रचत वडिलाची हत्या केली. दरम्यान मुलानेचं सुपारी देऊन वडिलाचा काटा काढल्याने खळबळ उडाली आहे.