Nagpur Accident : हिट अँड रन नव्हे तर ती सुनियोजित हत्या; सूनच निघाली सासऱ्याच्या हत्येमागील मास्टरमाइंड, नेमका प्रकार काय?
Nagpur Accident : नागपूरचे 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघातातून हत्येच्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड निघाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती पुढे आली आहे.
Nagpur Accident News नागपूर : नागपूरचे 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघातातून (Nagpur Accident) हत्येच्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड निघाली आहे. अर्चना पुट्टेवार यांनीच आपल्या 82 वर्षीय सासर्यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेचे माध्यमातून दिल्याचं पोलीस तपासात पुढे आलय. वाहनचालक सार्थक बागडेने या प्रकरणी नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना पुरुषोत्तम पुट्टेवार यांची अपघातातून हत्या करण्याच्या काम सोपवलं होतं.
पोलिसांनी (Nagpur Police) याप्रकरणी आधीच नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली होती. तर वाहन चालक सार्थक बागडे हा फरार झाला होता. त्यानंतर अर्चना पोट्टेवारला पोलिसांनी अटक केली होती आणि आता सार्थक बागडेलाही अटक करण्यात आली आहे. सुरवातीला वाटत असलेले हीट अँड रन अपघाताच्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले असून पोलिसांना तपासात मिळालेले माहितीच्या आधारे हा सुपारी किलिंगचा प्रकार उघड केला आहे.
नेमके प्रकरण काय?
नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना 22 मे रोजी एका भरधाव कार ने धडक दिली होती. त्यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला सर्वांना ते रस्त्यावर घडणारे हीट अँड रनचा प्रकार वाटला होते. सुरुवातीला पोलिसांनीही अपघाती मृत्यूचीच नोंद केली होती. मात्र, नंतर पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक सुनियोजित पद्धतीने घडविलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्दिष्टाने तो अपघात घडवण्यात आला होता, अशी माहिती मिळाली.
या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक देणाऱ्या कार मध्ये हे दोघे स्वार होते. दोघांनी या प्रकरणी पुट्टेवार कुटुंबात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या सार्थक बागडे ने अपघातातून हत्या करण्याचं काम सोपवल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसेच अपघातासाठी वापरण्यात आलेली सेकंड हॅन्ड कार खरेदी करण्यासाठी आणि अपघातातून हत्या करण्याच्या मोबदल्यात अर्चना पुट्टेवार यांनी काही लाख रुपये खर्च केल्याचेही कबूल केले होते. त्या आधारावर नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांना अटक केली होती. मात्र सुरुवातीपासूनच सार्थक बागडे (पुट्टेवार कुटुंबाचा वाहन चालक) याप्रकरणी फरार झाला होता.
आता नागपूर पोलिसांनी त्यालाही अटक केली असून याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची संख्या चार झाली आहे. दरम्यान याप्रकरणी आणखी काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध सध्या नागपूर पोलीस घेत आहेत. तर कोट्यवधींची संपत्ती हडप करण्याच्या उद्देशातून ही हत्या केल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या