एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपुरात दोन दिवसात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोघांची हत्या

Maharashtra Nagpur Crime News : नागपुरात दोन दिवसात दोघांची हत्या झाली. दोन्ही घटनांमध्ये हत्या झालेले आणि हत्या करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यामुळे गुन्हेगार जणू टोळी युद्ध करत असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Nagpur Crime News : नागपूर (Nagpur) शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसत आहे. कारण नागपुरात गेल्या दोन दिवसात दोघांची हत्या झाली. दोन्ही घटनांमध्ये हत्या झालेले आणि हत्या करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने नागपुरात गुन्हेगार जणू टोळीयुद्ध सुरु असल्याचं चित्र आहे.  

पहिली घटना नागपूरच्या (Nagpur) सदर पोलीस स्टेशनअंतर्गत नयी बस्ती परिसरात घडली. सागर शाहू नावाच्या रिक्षाचालकाला रागाने पाहतो या क्षुल्लक कारणावरुन विल्सन पिल्ले आणि त्याच्या सहकारी गुंडांनी धारदार शस्त्राने जीवे मारलं. काल रात्री सागर शाहू त्याच्या मित्रांसह बिअरबार मध्ये गेला होता. त्या ठिकाणी त्याने दुसऱ्या टेबलवर बसलेल्या विल्सन पिल्लेकडे पाहिले. त्यावेळी विल्सन पिल्लेने माझ्याकडे रागाने का पाहिले यावरुन जुना वाद उकरुन काढला. त्या ठिकाणी वाद वाढत असल्याचं पाहून सागरने तिथून काढता पाय घेतला. मात्र, विल्सन पिल्ले आणि त्याच्या टोळीने घराकडे निघालेल्या सागरचा पाठलाग केला. सागरचे मित्र त्यांच्या घराकडे निघून गेल्यानंतर नयी बस्ती भागात विल्सनच्या टोळीने सागरला घेरले आणि धारदार शस्त्रांनी वार करुन त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपी विल्सन पिल्लेला अटक केली आहे.

हत्येची दुसरी घटना सोमवारी (10 मे) रात्री गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भालदार पुरा भागात घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय तायवाडे नामक कुख्यात गुंडांची इतर काही गुन्हेगारांनी घरात शिरुन हत्या केली. सुरज धापोडकर नावाच्या कुख्यात गुंडाला त्याची पत्नीचे विजय तायवाडेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याच कारणावरुन त्याने शनिवारी ही विजयला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी सुरज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विजयच्या घरावर हल्ला केला होता.  मात्र, तेव्हा विजय पळून गेल्याने वाचला होता. सोमवारी रात्री सुरजने इतर दोन गुन्हेगारांना सोबत घेत विजयला त्याच्याच घरात घेरले आणि धारदार शस्त्राने जीवे मारले. धक्कादायक बाब म्हणजे या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुरज धापोडकर कुख्यात गुंड असून त्याला नागपुरातून तडीपार करण्यात आले आहे. मात्र तो तडीपार असून ही राजरोसपणे नागपुरात राहत होता आणि गुन्हेही करत होता.   

त्यामुळे नागपुरात गुन्हेगारांची तडीपारी फक्त जाहीर करण्यासाठी आणि नंतर कागदोपत्री ठेवण्यासाठीच आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Hyderabad Crime News: हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
हॉटेलच्या खोलीत CA चा दुर्दैवी अंत, यूट्यूबवर हेलियम गॅस हुंगण्याचे व्हिडीओ पाहिले अन्...; चिठ्ठीतून चक्रावणारं कारण समोर
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Chhatrapati Sambhajinagar Crime: शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
शाळेत मधल्या सुट्टीत धक्का लागला, विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने वर्गातच चौघांवर वार केले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Embed widget