एक्स्प्लोर

Mumbai Railway News : मुंबईत महिला असुरक्षित? धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेला डब्याबाहेर फेकले, आरोपीला अटक

Crime News : धावत्या एक्स्प्रेसमधून एका महिलेला धक्का मारून डब्याबाहेर फेकण्यात आले. या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime News :  मुंबईत रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धावत्या एक्स्प्रेसमधून एका महिलेला धक्का मारुन कोचबाहेर फेकण्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने सुदैवाने महिला प्रवासी बचावली आहे. दादर स्थानकात ही धक्कादायक घटना घडली असल्याचे म्हटले जाते. आरोपीचे नाव मनोज चौधरी असून त्याला पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर अटक केली. 

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या महिला डब्यात ही घटना घडली असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले. ही घटना रविवारी 6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

या घटनेतील पीडित महिलेचे वय 29 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोराने हल्ला करण्यात आला. हल्लेखोराचा प्रतिकार करत असताना आरोपीने धावत्या ट्रेनमधून तिला धक्का मारून बाहेर फेकले. महिलेने पोलिसांना पुढे सांगितले की, ट्रेन दादर स्थानकात प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा सर्वसाधारण महिला डब्यातील सर्व महिला प्रवासी खाली उतरल्या. त्यावेळी पीडित महिला त्या डब्यात एकटीच राहिली होती. ही संधी पाहून आरोपीने डब्यात प्रवेश केला. 

पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती ट्रेनमधून फेकली गेली तेव्हा ट्रेनने प्लॅटफॉर्म ओलांडला नव्हता. त्यामुळे ही पीडित महिला प्लॅटफॉर्मवर पडली. धावत्या ट्रेनमधून पडल्याने ती जखमी होऊन बेशुद्ध झाली.

पोलिसांनी आरोपी मनोज चौधरीला (वय 32 वर्ष) सीएसटी रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत होता. जेव्हा महिलेने त्याला महिलांच्या डब्यात चढण्यास आक्षेप घेतला तेव्हा आरोपीने महिलेला ट्रेनमधून ढकलले. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307, 394, 354, 150 (1)(ई), 153, 137, 147, 162 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ धावत्या लोकलमध्ये (Mumbai Local) एका तरुणाने 24 वर्षीय तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. या तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मालाड येथे राहणारी तरुणी शुक्रवारी रात्री कामानिमित्त चर्नी रोड येथे लोकलने जात होती.ग्रॅन्ट रोड स्थानक येताच एका तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

अश्लील चाळे, अश्लील वक्तव्य करीत तो तरुणीला त्रास देत होता. संबंधित तरुणीने आरडाओरडा केला असता त्या तरुणाने लोकलचा वेग कमी होताच उडी मारून पळ काढला. याप्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली. या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget