(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Web Series Fraud : 'कब तक छुपाओगी...' वेब सीरिजच्या नावाखाली व्यावसायिकाला कोटींचा गंडा, वर्सोवा पोलिसांत तक्रार दाखल
Web Series Fraud : 'कब तक जवानी छुपाओगी रानी' या वेब सीरिजच्या निर्मितीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Web Series Fraud : 'कब तक जवानी छुपाओगी रानी' या वेब सीरिजच्या (Web Series) निर्मितीच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार हरियाणातील एका व्यावसायिकाने केली आहे. आरोपी महिला पांचाली चक्रवर्तीने तक्रारदाराला तिच्या वेब मालिकेच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूकण्यास प्रवृत्त केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चित्रपट निर्मिती कंपनीच्या संचालकाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्यामुळे हरियाणातील एका व्यावसायिकाने वर्सोवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आरोपी महिला पांचाली चक्रवर्तीने तक्रारदाराला तिच्या वेब मालिकेच्या निर्मितीसाठी एक कोटी रुपयांची गुंतवणूकण्यास प्रवृत्त केले. त्या रकमेतून कोणतीही वेब सिरीज तयार न करता तक्रारदाराची फसवणूक केल्याचा आरोप आहे. योगेशकुमार राहार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार 2022-23 दरम्यान जेली बीन इंटरटेन्मेंट कंपनीच्या पांचाली चक्रवर्ती यांनी वर्सोवा येथील बंगल्यात बोलवून 'कब तक जवानी छुपाओगी रानी' या वेब मालिकेत गुंतवणूक केल्यास 50 टक्के निर्मिती खर्च परतावा म्हणून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार तक्रारदाराने 5 डिसेंबर 2022 ते 1 मे 2023 या कालावधीत एक कोटी रुपये रोख रक्कम आणि ऑनलाईन व्यवहारांद्वारे दिले. पण प्रत्यक्षात ती वेब सीरिज तयारच झाली नाही आणि रकमेचा अपहार करण्यात आला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्याबाबत विचारणा केली असता आरोपी महिलेने खोट्या गुन्ह्यात अडवकण्याची धमकी दिली असल्याचे राहार यांनी सांगितले. अखेर या प्रकरणी योगेशकुमार यांनी वर्सोवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पांचाली चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्रिपुरातील चोराची अनोखी शक्कल, मुंबईत पुलाखाली झोपायचा आणि चोरी करुन विमानाने पळून जायचा
मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात चोरीच्या (Theft) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चोरांना पकडण्यासाठी ठाणे क्राईम युनिट 5 (Thane Crime unit 5) च्या अधिकाऱ्यांनी दोन पथके तयार केली होती. यामध्ये पोलिसांना एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी त्रिपुराचा (Tripura) असल्याची माहिती मिळाली आहे. हा आरोपी त्रिपुराहून विमानाने मुंबईत येत होता.