एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Crime News : इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात; गिफ्टचं आमिष दाखवून 99 हजार 990 रुपयांची फसवणूक, पोलिसांनी मिळवून दिले 96 हजार

Crime News : दहिसर पोलीस ठाण्याच्या (Dahisar Police Station) हद्दीतील एका तरुणीची इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून फसवणूक झाल्याची घटना घडली.

Mumbai Crime News : मागील काही दिवसांपासून मुंबईत सायबर गुन्हेगारीमध्ये (Mumbai Cyber Crime) मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. दहिसर पोलीस ठाण्याच्या (Dahisar Police Station) हद्दीतील एका तरुणीची इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून फसवणूक (Fraud) झाल्याची घटना घडली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत तरुणीला गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून तिच्या वडिलांच्या खात्यातील तब्बल 99 हजार 999 गायब (Crime News) केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी कारवाई करुन 96 हजार रुपये परत मिळवून दिले आहेत.

तरुणीच्या वडिलांच्या खात्याची सर्व माहिती मिळाल्यामुळं घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीची इंस्टाग्राम या सोशल माध्यमातून एका तरुणाबरोबर ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर तरुणाने गिफ्ट पाठवण्याचे लालच दाखवत ट्रॅक ऑन सर्विस कुरिअरच्या माध्यमातून गिफ्ट पाठवले. हे गिफ्ट 20 तारखेपर्यंत पोहोचेल असे त्याने सांगितले. मात्र, गिफ्ट न पोहोचल्याने तरुणीने गुगलच्या माध्यमातून ट्रॅक ऑन सर्विस या कंपनीचा नंबर सर्च करून संपर्क केला.  त्यानंतर तरुणीने 92636230 या नंबरवर संपर्क केला. यावेली कुरियर संबंधित माहितीसाठी तरुणीला तीन रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र, याच वेळी तरुणीच्या वडिलांच्या खात्याची सर्व माहिती फ्रॉडरकडे गेल्यामुळं खात्यातील 99 हजार 990 रुपये अचानक खात्यातून कमी झाले. फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच तरुणीने दहिसर पोलीस ठाण्यात वडिलांसोबत जाऊन तक्रार दिली.

 96 हजार रुपये परत मिळवून दिले

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलिसांनी सायबर सेफ पोर्टलच्या माध्यमातून ट्रान्सफर झालेले पैसे आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आरबीएल बँकच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तक्रारदारास 96 हजार रुपये पुन्हा मिळवून दिले आहेत. 

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

इंटरनेटच्या वाढत्या प्रभावासोबतच सायबर गुन्हेगारीचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. संगणकावरील दस्तएेवज चोरी, व्हायरसच्या माध्यमातून धोका पोहोचवणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे, वैयक्तिक मर्यादांचा भंग करणे, ऑनलाइनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणे, समाजमाध्यमांवर अश्लील छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी आणि खंडणी उकळणे आदी गुन्ह्यांचा यात समावेश आहे. ऑनलाइन फसवणुकीसह सायबर गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. इंटरनेट वापरकर्त्यांत सर्वाधिक युवकच आहेत. दरम्यान, अशा प्रकरणात आरोपींना पकडणे पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Yavatmal : दहाची जुनी नोट विक्री करणं पडलं 22 हजारांत; तरुणाची ऑनलाईन फसवणूक, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget