धक्कादायक! प्रमोशन देण्याच्या बहाण्यानं महिलेला केबिनमध्ये बोलावलं, अन्...; सहाय्यक कामगार आयुक्तांवर गुन्हा दाखल
Mumbai Crime News : 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सहाय्यक कामगार आयुक्तांवर मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रमोशन (Promotion) देण्याच्या बहाण्याने महिलेला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्तांविरुद्ध (Assistant Labor Commissioner) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेने पायधुनी पोलीस ठाण्यात (Pydhonie Police Station) तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पायधुनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश दाभाडे हे मेटल अँड पेपर मार्केट आणि शॉप माथाडी कामगार बोर्डाचे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सहायक कामगार आयुक्तांनी प्रमोशन देण्याच्या बहाण्याने आपल्या केबिनमध्ये बोलावले आणि गैरवर्तन केल्याचा आरोप महिलेने केले आहे.
सहाय्यक कामगार आयुक्तांवर गुन्हा दाखल
महिलेने पायधुनी पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पायधुनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दाभाडे यांना नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या