(Source: Poll of Polls)
Mumbai Crime: मुंबई हादरली; व्यावसायिकाच्या पत्नीची गळा आवळून हत्या, फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ
Mumbai Crime: नेपियन सी रोडवरील निर्जन हाईट्स इमारतीत एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. नेपियन सी रोड म्हणजे, दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर.
Mumbai Crime News: मुंबई : मुंबईतील (Mumbai News) सर्वात हाय प्रोफाईल आणि सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपियन सी रोडवरील (Nepean Sea Road) अत्यंत धक्कादायक घटना घडली. या घटनेनं संपूर्ण मुंबई (Mumbai Crime News) हादरली आहे. नेपियन सी रोडवरील निर्जन हाईट्स इमारतीत एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली. नेपियन सी रोड म्हणजे, दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसर. जिथे अनेक मोठे व्यापारी आणि राजकारणी राहतात. त्यामुळे हा परिसर हाय प्रोफाईल परिसर म्हणून ओळखला जातो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती शाह असं मृत महिलेचं नाव असून तिचं वय 63 वर्ष आहे. मृत महिलेच्या पतीचं नाव मुकेश शाह असून तो एका ज्वेलरी शोरूमचा मालक आहे. महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. तसेच, पोलिसांकड़ून कसून आरोपींचा शोध सुरू आहे.
Maharashtra | A 63-year-old woman namely Jyoti Shah was found murdered in the Nepean Sea Road area. Her husband owns a jewellery shop. Police said that she was strangulated. Malabar Hill Police has registered an FIR under section 302 of IPC and started a probe to find the…
— ANI (@ANI) March 12, 2024
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना घरातील नोकरावर संशय आहे. ज्योती शाह आणि मुकेश शाह दोघांचंही वय जास्त होतं. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी घरातील कामांचा भार हलका व्हावा यासाठी एका नोकराला ठेवलं होतं. तो घरातली सगळी कामं करायचा. त्याच्यामुळे ज्योती शहांना घरकामात हातभार लागत होता. पण जेव्हापासून ज्योती शाह यांची हत्या झाली आहे. तेव्हापासून त्यांच्या घरातील नोकरही बेपत्ता आहे. पोलिसांनी त्याच्याबाबत शेजारी-पाजारी, वॉचमन, ज्योती शाहांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली. पम त्याच्याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांच्या संशयाची सुई घरातील नोकरावर गेली. पण सध्या तो बेपत्ता असल्यामुळे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलीस इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि याप्रकरणी संबंधित लोकांची चौकशी करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणूक, श्रीमंत बनण्याची लालसा; एका फटक्यात वृद्धानं गमावले 1.12 कोटी