एक्स्प्लोर

Cyber Crime : शेअर बाजारात गुंतवणूक, श्रीमंत बनण्याची लालसा; एका फटक्यात वृद्धानं गमावले 1.12 कोटी

Cyber Crime : 2022 मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची 65893 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Senior Citizen Duped For 112 Crore: मुंबई : देशात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. अनेकांना सायबर भामटे लोखो, कोट्यवधींना गंडा घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. जनजागृतीचा अभाव आणि झटपट श्रीमंत होण्याची लालसा यांमुळे मोठ्या प्रमाणात लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडत आहेत. NCRB च्या अहवालानुसार, 2022 मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची 65893 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनं भिरभिरलं तोच मुंबईत एक सायबर गुन्ह्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. 

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचं आश्वासन देऊन, एका ज्येष्ठ नागरिकाची 1.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी भरत दीपक चव्हाण याला शुक्रवारी वांद्रे उपनगरातून अटक करण्यात आली. त्याच्या 33 बँक खात्यांमध्ये जमा केलेले 82 लाख रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत. 

नेमकं काय घडलं? 

एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत दीपक चव्हाण यानं अनेक बँक खाती उघडली होती. त्यापैकी 1.12 कोटी रुपये डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान मिळाले आहेत. मुंबईत राहणारे आणि वयवर्ष 68 असणारे तक्रारदार संदीप देशपांडे यांनी पोलिसांना सांगितलं की, डिसेंबरमध्ये त्यांना वेगवेगळ्या नंबरवरून अनेक व्हॉट्सॲप मेसेज आले. या मेसेजमध्ये शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा असल्यामुळे ते त्या ग्रुपमध्ये सामील झाले. 

...अन् शंकेची पाल चुकचुकली 

आरोपी भरत दीपक चव्हाण यांनी संदीप देशपांडे यांच्या नावानं ट्रेडिंग खातं उघडल्याचं त्यांना सांगितलं. तसेच, देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत असल्याचं दाखविण्यात आलं. तक्रारदार देशपांडे यांनी त्यांना झालेला नफा चव्हाणकडे मागितला. मात्र, तुम्हाला जर नफ्याची रक्कम हवी असेल तर त्यासाठी आगाऊ कराचा भरणा करावा लागेल, असं सांगितलं. त्यावेळी देशपांडे यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ सायबर सेलमध्ये धाव घेतली आणि घडला सगळा प्रकार सांगितला.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 420 (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या सहाय्यानं आरोपी संदीप चव्हाणचा माग काढला. त्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सWhat Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Embed widget