एक्स्प्लोर

Mumbai Crime : लाईव्हस्ट्रीमिंग सुरु असताना खार परिसरात कोरियन यूट्यूबरचा विनयभंग, आरोपींना बेड्या

Mumbai Crime : मुंबई पश्चिम उपनगरातील खार परिसरात एका कोरियन यूट्यूबरचा लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान दोन तरुणांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी सुमोटा गुन्हा दाखल करुन घेत आरोपी तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. 

Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील खार (Khar) इथे एका परदेशी महिला (Foreign Women) यूट्यूबरचा (YouTuber) विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही तरुणी व्हिडीओ शूट करत असताना स्थानिक तरुणांनी तिची छेड काढली. संबंधित तरुणी ही दक्षिण कोरियाची (South Korea) नागरिक आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खार पोलिसांनी या प्रकरणी सुमोटा गुन्हा दाखल करुन घेत आरोपी तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय 19 वर्षे) आणि मोहम्मद नकीब सदरेआलम अन्सारी (वय 20 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी ही तरुणी खार रेल्वे स्थानकाजवळील रोड नंबर पाचवर लाईव्हस्ट्रीमिंग करत होती. यावेळी तिथे दोन तरुणांनी तिचा हात पडकून खेचण्याचा, जबरदस्ती करण्याचा आणि चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्यांना दूर केलं. ही तरुणी घटनास्थळावरुन दूर जाऊ लागल्यानंतर तोच तरुण आपल्या एका मित्रासह बाईकवरुन पुन्हा तिच्या दिशेने आला आणि तिला जिथे जायचं आहे सोडण्याची ऑफर दिली. मात्र तिने त्याची ऑफर नाकारली, असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

यूट्यूबरच्या फॉलोअरने संबंधित प्रकार ट्विटरवर शेअर केला
हा सर्व प्रकार तिच्या एका फॉलोअरने मुंबई पोलिसांना मेंशन करुन संबंधित व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. त्यात लिहिलं आहे की, "पीडित तरुणी ही दक्षिण कोरियाची नागरिक आहे. खार परिसरात लाईव्हस्ट्रीमिंग करत असताना काही स्थानिक तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं."

तरुणीचं ट्वीट 
दरम्यान संबंधित यूट्बूरने देखील या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं आहे की, काल रात्री लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान एका तरुणाने मला त्रास दिला. हे प्रकरण फार वाढू नये आणि तिथून निघून जाऊ यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला, कारण तो त्याच्या मित्रासोबत होता. पण काही लोकांनी म्हटलं की मी फारच फ्रेण्डली वागू लागल्यामुळे आणि बातचीत सुरु केल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेने मला स्ट्रीमिंगबाबत पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.

सुमोटो गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या
त्यानंतर तात्काळ खार पोलीस ठाणे सतर्क झाले. त्यांनी या प्रकरणाली तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी जबाब देण्याचा स्थितीत नव्हती. अखेर खार पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल करत या तरुणांचा शोध सुरु केला. वांद्रे येथील रहिवासी असलेल्या या तरुणांना खार पोलिसांनी काल (30 नोव्हेंबर) रात्री अटक केली आहे. मात्र या प्रकरणाचा सोशल मीडियावर जोरदार निषेध सुरु झाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif On Beedतोपर्यंत राजीनाम्याची आवश्यकता नाही,बीड प्रकरणी हसन मुश्रीफ म्हणालेAmol Kolhe On Prajakta Mali:Suresh Dhas यांचं स्टेटमेंट क्लिअर,शिंतोडे उडवायचा प्रयत्न नाही'ABP Majha Marathi News Headlines 08 pm TOP Headlines 08 pm 28 December 2024Urmila Kanetkar Car Accident : अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कोठारेवर उपचार सुरु, कुटुंबाची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
Prajakta Mali: प्राजक्ता माळी पत्रकार परिषदेत भावूक; कंठ दाटला, रुमाल काढला, पाणीही प्यायल्या
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
महाराष्ट्रात हवाई दळणवळणाचे बळकटीकरण; मुख्यमंत्र्यांकडून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
16 तास वेटींग... मुंबई विमातळावर प्रवाशी दिवसभर ताटकळले; सकाळी 6.30 च्या विमानाचे रात्री 11 वाजता उड्डाण
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
धक्कादायक! घरात झोपलेल्या पती-पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न, घराच्या दारावर पेट्रोल ओतून लावली आग
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
Embed widget