(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : लालबागमध्ये दोन खळबळजनक घटना; प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळला तर निर्माणाधीन इमारतीत तरुण मृतावस्थेत सापडला!
Mumbai Crime : मुंबईतील लालबाग परिसरात मंगळवारी (14 मार्च) दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटना काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या आहेत.
Mumbai Crime : मुंबईतील लालबाग (Lalbaug) परिसरात मंगळवारी (14 मार्च) दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये 53 वर्षीय महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये (Plastic Bag) सापडला. तर दुसरीकडे एका निर्माणाधीन इमारतीत 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. दोन्ही घटना काळाचौकी पोलीस स्टेशनच्या (Kalachowki Police Station) हद्दीत घडल्या आहेत. दोन्ही प्रकरणांचा तपास काळाचौकी पोलीस करत आहेत
पहिली घटना काय?
परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "संबंधित महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले. त्यावेळी घरात शोध घेताना महिलेचा मृतेदह एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला होता आणि तो सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. तसंच महिलेच्या मृत्युच्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत." दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली जात आहे.
मुंबई के लालबाग इलाके में एक वादी ने अपनी बहन के गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज़ कराई थी। महिला के घर में तलाशी के दौरान एक प्लास्टिक बैग में विघटित अवस्था में महिला का शव मिला। शव को पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। जांच जारी है: DCP प्रवीण मुंडे, मुंबई pic.twitter.com/fzdm92Vz4N
— ANI_HindiNews (@AHindinews) March 15, 2023
दुसरी घटना काय?
तर दुसरीकडे लालबाग परिसरातच अशीच काहीशी घटना घडली. लालबागमधील एका निर्माणाधीन इमारतीच्या बाराव्या मजल्यावर 19 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. मसूदमियां रमझान असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित तरुणाला मारण्यापूर्वी आरोपीने त्याचे हात आणि पाय बांधले होते, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी अज्ञाताविरोधात काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या निर्माणाधीन इमारतीत तरुणाचा मृतदेह आढळला ती 45 मजल्यांची आहे आणि मृत तरुण तिथे काम करत होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Maharashtra | Police filed murder case against unknown person after they found a body on 12th floor of an under-construction building in Lalbaug area under Kalachowki PS. Police informed that the accused tied the deceased person's hands & feet before killing: Mumbai Police
— ANI (@ANI) March 14, 2023