एक्स्प्लोर

बिहारमध्ये सुरु होता जीवनावश्यक वस्तूंचा 'जामतारा' कॉलसेंटर, खोटी जाहिरात करुन करत होते फसवणूक

सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. सर्व उच्चशिक्षित असून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भाग कत्रीसराय, बिहार शरीफ आणि वारसलिंगज येथून टोळक्याने काम करत होते.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी एका अशा आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी तुमची गरज ओळखून तुम्हाला टार्गेट करुन तुमची फसवणूक करत होते. ॲाक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो, लस मिळवून देतो असा स्वरुपाच्या खोटे फोन खोटी जाहिरात करुन ही टोळी देशात अनेकांची फसवणूक करत होती.  या करता ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत होती. 

 देशात 18  ते 44 वयाच्या नागरीकांना लसीकरण दिले जात नव्हते. तेव्हा सोशल मीडियावर जाहिरात यायच्या तसच नंतर फोन यायचे कमी पैशांत पुढील काही तासात वॅक्सिन पाहिजे असेल तर या नंबर पैसे पाठवा. ॲाक्सिजन सिलेंडर पाहिजे, रेमडिसिवीर इंजेक्शन पाहिजे एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो असे फोन मेसेज आणि जाहिराती येतात ज्यांना गरज असते ते अशा फोन मेसेज आणि जाहिरातींना संपर्क करतात आणि वाट पाहत बसतात आणि त्यांना वाटच पाहावी लागते.  कारण हे असे फोन मेसेज आणि जाहिरात खोट्या असतात. गरजवंत माणसांची नड लक्षात घेवून अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते. अशाच एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी पर्दाफाश केला. 

सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. जे सर्व उच्चशिक्षित असून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भाग कत्रीसराय, बिहार शरीफ आणि वारसलिंगज येथून टोळक्याने काम करत होते. जमतारा सारख्या वेब सीरीजप्रमाणे या टोळीने देखील त्यांचे कॉल सेंटर थाटले होते. 

 प्राथमिक तपासातच या टोळीचे मोठं मोठे कारनामे समोर आलेत 

  • या टोळक्याने अनेक मोठ्या कंपन्या आणि हॉस्पिटल तसच काही राज्यांच्या शासकीय स्वरुपाच्या बोगस जाहिराती बनवल्या होत्या. 
  • या टोळक्याने प्राथमिक तपासानुसार गेल्या काही दिवसातच 210 जणांची फसवणूक केली.  
  • मध्यरात्री दोनच्या सुमारास बिहार पोलिसांच्या मदतीने सायबर क्राईम पोलिसांनी या टोळक्यावर जेव्हा धाड टाकली होती. 
  • ही टोळी सतत मोबाईल नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर बदलायची. 
  •  या टोळीचे 32 बनावट बॅंक खाते जप्त करण्यात आले. 
  • गेल्या काही दिवसातच या टोळीने जवळपास 60 लाख रुपये फसवणूक करुन मिळवले होते. 
  • तर, या टोळीला कोलकात्यातून बोगस सिम कार्ड पुरवले जायचे. 

या अशा प्रकारच्या उच्च शिक्षित हायटेक आर्थिक फसवणूक करणा-या टोळ्या काळानुरुप गरजा लक्षात घेऊन जाळं तयार करतात. सायबर पोलिसांनी पकडलेल्या टोळीने तर कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असल्याने यावेळेस कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करता येईल याची देखील तयारी केली होती. पण त्या आधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. खरं तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण स्वत:चा बचाव करु शकता. याकरता फक्त एकच करा शासकिय वेबसाईट किंवा सुरक्षित वेबसाईट आणि अधिकृत वेबाईसाईट किंवा लिंकचाच वापर करायचा नाही तर तुमची फसवणूक झालीच. 

संबंधित बातम्या :

Jamtara : जामताराच्या एका 'हॅलो' वर लोक होतात कंगाल! काय आहे जामतारा?

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget