एक्स्प्लोर

Crime News : 'खाकी'चा धाक दाखवून मुंबईतील हॉटेल मालकाला 25 लाखांना लुटलं, मुख्य आरोपींना दिल्लीतून अटक; दोन पोलिसांसह एकूण 11 आरोपी अटकेत

Mumbai Crime News : मुंबईत कॅफे म्हैसूर हॉटेल मालकाचा घरी 25 लाख रुपये लुटणाऱ्या मुख्य दोन आरोपींना दिल्लीमधून अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) सायन पोलीस स्टेशनच्या (Sion Police Station) हद्दीत कॅफे म्हैसूरच्या (Cafe Mysore Hotel) मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणात सायन पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलिसांसह 9 आरोपींना सायन पोलिसांकडून अटक (Two Accuse Arrested) करण्यात आली होती. मात्र, दोन मुख्य आरोपी फरार होते, त्यांना देखील सायन पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीत पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरात घूसून 25 लाखांची रोकड लुटल्याची घटना मुंबईच्या सायन येथे घडली होती. 

मुंबईतील कॅफे मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं

मुंबईत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र खळबळ माजली होती. आरोपी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत त्यांनी आपली ओळखपत्र हॉटेल मालक नरेश यांना दाखवली. तुमच्या फ्लॅटमध्ये 17 कोटी रुपयांचा काळा पैसा ठेवला असून तो लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे, अशी आम्हाला माहिती मिळाल्याचं संबंधित व्यक्तींनी नरेश यांना सांगितलं. नरेश यांनी आपल्याकडे एवढी मोठी रक्कम असल्याचं नाकारलं.

हॉटेल मालकाचे 25 लाख रुपये लंपास

त्यानंतर या आरोपींनी हॉटेल मालकाच्या घरी सर्च करून 25 लाख रुपये रोकड घेऊन फरार झाले होते. हॉटेल मालकाचा तक्रारी नंतर सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पोलीस कर्मचाऱ्यासह नऊ लोकांना अटक केली होती. मात्र या गुन्ह्यात मास्टरमाइंड मुख्य आरोपी प्रेमचंद जैस्वाल वय 54 वर्ष आणि त्याच्या साथीदार पडून गेले होते. सायन पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल दीड महिना नंतर दोन्ही आरोपींना दिल्ली मधून अटक केली आहे.

दोन आरोपींना दिल्लीमधून अटक

अटक मुख्य आरोपीचे नाव प्रेम चंद जैस्वाल वय 54 वर्ष आणि त्याचा साथीदार आरोपी कृष्णा नाईक वय 34 वर्ष आहे. प्रेमचंद जैस्वाल हा मास्टरमाइंड आरोपी असून त्याच्यावर मुंबई शहरात अशाच पद्धतीने रॉबरी करण्याचे पाच गुन्हे  दाखल आहेत. सध्या सायन पोलिसांनी दिल्लीमधून या दोन्ही आरोपीला अटक करून मुंबईला घेऊन येऊन या आरोपीचा आणखी कोण साथीदार आहे का? मुंबई शहरात या आरोपीने किती चोऱ्या केल्या आहेत, या संदर्भात अधिक तपास सुरु आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; 2 चिमुकल्यांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Embed widget