(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mira Road Crime : मीरा रोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडात प्रकरणातील आरोपी सानेवर दोषारोपत्र दाखल
Mira Road Crime: मनोज सानेवर नया नगर पोलिसांनी हे दोषारोपत्र न्यायलयात सादर केले आहे. यात एकूण 62 साक्षीदार तपासले गेले आहेत.
मुंबई : संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या सरस्वती वैद्य हत्याकांडातील (Mira Road Crime) आरोपी मनोज सानेवर अखेर नया नगर पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात 1200 पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे. आरोपी मनोज साने आणि मयत सरस्वती वैद्य हे दोघे ही मिरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. आरोपी सानेनं सरस्वती वैद्य हिची हत्या विष देऊन केली. त्यानंतर तिचे असंख्य तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले. काही तुकडे जवळच्या नाल्यात फेकले. अशा असंख्य पैलूवर तपास करत नया नगर पोलिसांनी हे दोषारोपत्र न्यायलयात सादर केले आहे. यात एकूण 62 साक्षीदार तपासले गेले आहेत.
मिरा रोडमध्ये 8 जूनला मानवतेला काळिमा फासणारी घटना उजेडात आली. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्याच रूम पार्टनरची आरोपीने निघृण हत्या केली. मिरा भाईंदर उड्डाणपुलाशेजारी ही क्रूर घटना घडली. आरोपी मनोज साने ज्याच वय 56 वर्ष आहे. त्याने आपली रुम पार्टनर 32 वर्षीय मयत सरस्वती वैद्य हिची रहात्या घरातच क्रूर हत्या केली. आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भयानक पध्दत अवंलबली.
मनोज साने ने सरस्वती वैद्य हिची हत्या 4 जूनला घरात केली. मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघे 2017 पासून मिरा रोड येथे लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. वैद्य हिच्याबरोबर सहा महिन्यापासून भांडण सुरु होतं. त्यामुळेच त्याने सरस्वतीला मारण्याची योजना बनवली.त्याने तिला ताकातून विष दिले.तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने चक्क करवतीचा आणि कटर मशीनचा वापर केला. सानेनं सरस्वतीची हत्या केल्यानंतर तब्बल 35 फोटो तिच्यासोबत काढले. ते फोटो ही पोलिसांनी पुरावा म्हणून जोडले आहेत. आरोपी सानेने सरस्वतीचा मृतदेहाचे असंख्य तुकडे करून ते तुकडे कुकर मधून शिजवले. त्यानंतर त्याने आपल्या बाईकद्वारे शेजारील नाल्यात ते तुकडे फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. पोलिसांना आरोपीच्या घरातून असंख्य तुकडे सापडले. ते कुकर, तीन पोतेले, दोन बादल्या ही जप्त केल्या आहेत. सानेच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजा-यांनी पोलिसांना बोलावल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. या दोषारोपत्रात शेजा-यापासून न्यायवैद्यक कर्मचा-यापर्यंत असे 62 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
मनोज साने तपासात पोलिसांची दिशाभूल करत होता. त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याचा तपास करण्याच मोठं आवहान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी तपास पूर्ण करुन चार्जशिट न्यायालयात सादर केल्यामुळे केस आता जलदगतीने कोर्टात सुरु होऊन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा :