VIDEO : हृदयद्रावक! पोटच्या गोळ्याचीच जन्मदात्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण, वडिलांनी जीव सोडला
Crime News : मालमत्तेसाठी वृद्ध पित्याला मुलाने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. वृद्धाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आळला आहे.
मुंबई : मालमत्तेच्या (Property) हव्यासापायी मुलाने वृद्ध पित्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अखेर वडिलांनी जीव सोडला. वृद्ध व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, आता त्यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रॉपर्टीसाठी वृद्ध पित्याला मुलाने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. वृद्धाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आळला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये मुलगा वृद्धाला एका मागोमाग एक बुक्यांनी अमानुष मारहाण करताना दिसत आहे.
पोटच्या गोळ्याचीच जन्मदात्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
तामिळनाडूतील पेरांबलूर जिल्ह्यातील कृष्णपुरम येथे 16 फेब्रुवारी रोजी 40 वर्षीय के संतोषने त्याचे वडील ए कुलंदाइवेलू यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मालमत्तेच्या वादातून त्याच्या 63 वर्षीय वडिलांना निर्दयीपणे मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी आरोपी 40 वर्षीय मुलाला अटक केली आहे. वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूमध्ये मुलाचा हात असल्याचा संशय निर्माण झाला. यातूनच ही घटना उघडकीस आली आहे.
मालमत्तेसाठी मुलाची पित्याला बेदम मारहाण
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, वडील कुलंथाइवेलू एका बाकड्यावर बसलेले दिसत आहेत. त्यानंतर त्यांचा मुलगा संतोष तिथे येतो आणि त्याच्या वडिलांवर एकामागोमाग एक बुक्क्यांनी बेदम मारहाण करताना दिसत आहे. लवकरच दुसरा माणूस तिथे पोहोचलो आणि संतोषला तिथून घेऊन जातो. मात्र, त्याआधीच बाकड्यावर बसलेला वृद्ध व्यक्त बेशुद्ध झालेला व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा मारहाणीचा व्हायरल व्हिडीओ
⚠️Disturbing Visual
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) April 28, 2024
Man beats to death his father over property dispute….
Where are we heading as a society and humans ?? pic.twitter.com/QsnK4OwHxQ
सुरुवातीला, 16 एप्रिलला मारहाणी केल्यानंतर वडील कुलंदाइवेलू यांनी मुलगा संतोषविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र त्यांनी नंतर तक्रार मागे घेतली. यानंतर कुलंदैवेलू यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने 18 एप्रिल रोजी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मुलगा संतोषविरुद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केली.
भारतीय दंड संहितेच्या कलम 323 (स्वच्छेने दुखापत करण्यासाठी शिक्षा), 324 (स्वच्छेने धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), आणि 506 (ii) (गुन्हेगारी धमकावण्याची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यानंतर आरोपी मुलगा संतोषला अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :