(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोशल मीडियावरील चॅटवरून वाद पेटला; दोन तरुणांचा खून, एक गंभीर जखमी, जत तालुक्यातील घटना
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून झाला
सांगली : सोशल मिडीयावर चॅटींग केल्याच्या वादातून दोन तरुणांचा खून झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी मध्ये घडली आहे. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी देखील झाला आहे. मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर ही घटना घडली आहे. मयताच्या अंगावर वार झालेले असून या गुन्ह्यात तलवार देखील वापरली असून या शिवाय दगड, काठ्याचा देखील या गुन्ह्यात वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी सात संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे मध्यरात्री 12 वाजता मंगळवेढा रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुणांचा निर्घृण खून झाला. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे . जखमी तरूणांना सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तरुणाला दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडीयावर चॅट केल्याचा राग मनात धरून तरुणांचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर यामध्ये सात संशयित आरोपी सध्या पोलिसाच्या ताब्यात आहेत. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.
उमदी येथे खून दोन जण मयत एक गंभीर जखमी या घटनेत मयत झालेल्या गुंडा उर्फ मदगोंडा बगली व संतोष राजकुमार माळी तर गंभीर जखमी झालेल्या प्रकाश परगोंड याला सोलापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ग्रुपवरील मोबाईल चॅटिंगवरून ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. घटनेत तलवार, दगड, काठी व चाकूचा वापर केल्याचे समजते. उमदीपासून दोन किलोमीटर अंतरावर उमदी ते पंढरपूर मंगळवेढा हायवेवर ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमदी पोलिस करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, एलसीबीचे सर्जेराव गायकवाड,प्रशांत निशानदार,जतचे उपअधीक्षक रत्नाकर नवले व टीम घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या. अधिक तपास उमदी पोलीस ठाण्याचे करत आहेत.