(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime : ...अन् मागे राहिली फक्त चिठ्ठी, शेअर बाजारातील नुकसानामुळे दोघांनी संपवलं जीवन
Maharashtra Mumbai Crime News : शेअर बाजारातील नुकसानीमुळे दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरामध्ये पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे.
Maharashtra Mumbai Crime News : रशिया (Russia) आणि युक्रेनमधल्या युद्धामुळं देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) अस्थिरता दिसून येत आहे. शेअर बाजारात सातत्यानं चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अशातच बाजारात सातत्यानं होणाऱ्या चढ-उतारांमुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशातच शेअर बाजारात झालेल्या नुकसानामुळे दोघांनी गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.
शेअर बाजारातील नुकसानीमुळे मुंबईत आत्या आणि भाच्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंबईच्या मुलुंडमध्ये ही घटना घडली आहे. राजेश कांबळी आणि प्रमोदिनी कांबळी अशीस आत्महत्या करणाऱ्या दोघांची नावं आहेत. शेअर बाजारातील आर्थिक नुकसानाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांच्या घरात सापडली आहे.
मुंबईतील मुलुंड पूर्व येथील एका घरात सोमवारी आत्या आणि भाच्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. बंद घरातून दुर्गंधी येत असल्यामुळं स्थानिक रहिवाशांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना दोन मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यात शेअर बाजारातील नुकसानाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद केलं आहे. तर प्रमोदिनी यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aurangabad News : शिवसेना आमदार बोरनारे यांच्या अडचणीत वाढ? मारहाणीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल
- Nashik News : दारुड्यांची तक्रार, पण पोलिसच 'टाईट'; नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी
- Buldana News : अवैध रेती तस्करांनी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha